लॉकडाऊन - नाट्यछटा १
लॉकडाऊन नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय आपलं? बरं आहे ना! असं मी का विचारतोय? आपण सगळेच लॉकडाऊन आहोत ना! म्हणून म्हटलं कसं वाटतंय? काय म्हणताय...बांधून घातल्यासारखं वाटतंय. खूप दिवस झाले घरातून बाहेर जाता आलं नाही किती दिवस. मॉर्निंग वॉक नाही, बाजारात जायला मिळालं नाही, नोकरीवर जायला मिळालं नाही. पाहुण्यांच्या घरी जाता येत नाही. असं तर सगळ्या मोठ्या लोकांचं रडगाणं सुरू झालं आहे. हॅलो हॅलो बोल की गोट्या, काय सांगायला लागलायस ते कळू दे तरी. अरे मोठ्याने बोल की. ऐकू येत नाही. काय म्हणतोयस? मी काय करतोय? काय करणार! 'आलिया भोगासी असावे सादर, ओढून घ्यावी चादर, खालवर' असं मी का म्हणतोय? मग ऐक तर...अरे बाबा! तुला माहिती नाही? असं काय करतोयस? अरे बाबा, आपण लॉकडाऊनमध्ये आहे. काय करणार मी? खायचं आणि झोपायचं याशिवाय दुसरं काय काम आहे? बरं. तुझं काय चाललंय? अरे, व्वा! मस्त. सुट्टीत चांगलं काम सुरू आहे म्हणायचं. काय काय केले आहेस? पिंपळाच्या पानावर सुंदर नक्षीकाम केलेस. वा मर्दा वा! काय म्हणतोयस? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू मह...