Posts

माझी मराठी माझी जबाबदारी

🔴 *माझी मराठी माझी जबाबदारी.* ======================         मराठी ही आमची मायबोली असून तिची गोडी हवी आहे. मराठीच्या समृद्धीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानदेवापासून अलीकडच्या काळातील नव साहित्यिकांच्या पर्यंत अनेक कवी, लेखकांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. मराठीला ग्रांथिक आकार दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मायबोली मराठीचे सुपुत्र आणि आपला लढा उभारला. त्याचीच परिमिती म्हणून एक मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.             संतांबरोबर पंडित कवी, शाहीर कवींनी मराठीत ग्रंथरचना करून लोकांना अध्यात्म काव्यपरिचय करून दिला. आणि पोवाड्यांची रचना करून मराठीचा झरा अखंड ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच काळात अनेक आक्रमणांनी इथला भाग जिंकून घेतला. भाषिक आक्रमणे ही मराठीवर झालीत. अनेक परकीय आणि परभाषीय शब्द मराठीत स्थिरावले. संत एकनाथांना तर ज्ञानेश्वरीची पाठ्यशुद्ध प्रत तयार करावी लागली. पण मूळचीच रसाळ, मधाळ असणाऱ्या मराठी भाषेने या प्रतिकूल आणि संभ्रमाच्या काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.         १८१८ साली मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि  इ

टिक टिक वाजतंया

टिक टिक वाजतंया डोक्यात  धडधड होतंया माझ्या उरात | धृ | कसं सोडवू सांगा मी गणित  भीती वाटते हो माझ्या मनात |1| इंग्रजी नाहीच हो मला येत  व्याकरण ही नाही हो सुटत | 2 | करावे वाटे हो काम शेतात  अभ्यास शिरत नाही डोक्यात | 3 |  लक्ष सारं हो माझं खेळात  नुसत्या उचापती करण्यात | 4 |

आता कुठे

आता कुठे  मुली शिकू लागल्या,  मोठ्या होऊ लागल्या,  वेगवेगळ्या पदावर आरूढ  झाल्या.  आणि प्रगती करू लागल्या.  आता कुठे  सरपंच, सभापती, अध्यक्ष झाल्या.  राजकारणात डोकावू लागल्या.  पुरुषी अहंकाराला धक्का देऊ लागल्या.  आता कुठे  स्रिया जागृत झाल्या,  समाज वाचवण्यासाठी पुढे आल्या.   या पृथ्वीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी  या महिलाच काम करू लागल्या. 

टिक टिक वाजतंया

टिक टिक वाजतंया डोक्यात  धडधड होतंया हो उरात |धृ.|  कसं मी सोडवू गणित  भीती वाटते हो मनात |१| इंग्रजी नाही हो मला येत  नाही व्याकरणही सुटत |२| करावे वाटे काम हो शेतात अभ्यास शिरत नाही हो डोक्यात |३|  लक्ष सारं माझं हो खेळात  नुसत्या उचापती करण्यात |४|

शिरीषकुमार कथा

बाळांनो, ही कथा आहे एका शूरवीर बालकाची. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तो मुलगा तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. शाळेला जाणारा विद्यार्थी. आज शाळेला सुट्टी होती. तरीही तो लवकर उठून शाळेला निघाला होता. कारण  सर्व मुलांनी शाळेत जमा व्हायचं ठरवलं होतं. तो गडबडीने घराच्या बाहेर पडत होता. तोच त्याच्या कानावर आजीचे शब्द आले. "बाळ शिरीष, आज तू लाडू वळायला येत नाहीस?" त्यावर शिरीष म्हणाला, "ते कसे शक्य आहे? तूच सांग ना गं आजी. अगं सारा देश गुलामगिरीच्या खाईत लोळत असताना मी लाडू वळायला कसा येऊ? ते आता शक्य नाही. कारण सारी मुले माझी वाट बघत बसली असतील तिकडे शाळेत. आणि मी इकडे लाडू वळत बसू! नाही. नाही. नाही. एकदा नव्हे हजारदा सांगेन की मी लाडू वळायला बसणार नाही. आजीनं त्याला विचारले, "अरे बाळ, आज शाळेला सुट्टी आहे ना? " मला शाळेत गेलंच पाहिजे कारण शाळेत प्रभात फेरी आयोजित केले आणि आम्ही सगळी मुलं या प्रभात फेरीमध्ये सामील होणार आहे. मी जर शाळेत गेलो नाही; तर सारी मित्र मला भित्रा म्हणून चिडवतील. आणि बरं का आजी, या माझ्या भारतभूमीला जुलमी इंग्रजांच्या तावडीतून कोण स

कडेलूट - परीक्षण - परशराम आंबी

*जसं करावं तसं भरावं म्हणजेच  पर्यावरणाचा नाश केला तर माणसांचाच नाश होईल हे वास्तव मांडणारी कादंबरी म्हणजे कडेलूट*    *- परशराम आंबी*         डॉ. श्रीकांत पाटील यांनी कोरोना महामारीमुळे झालेल्या लाॅकडाऊन मधील जीवनावर आधारित लॉकडाऊन कादंबरी लिहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारी ऊसकोंडी कादंबरी लिहिली. तर २०१९ व  २०२१ च्या महापुराच्या परिस्थितीवर आधारित पाणीफेरा ही कादंबरी लिहिली. अशा सलग तीन यशस्वी कादंबऱ्यानंतर *कडेलूट* ही चौथी कादंबरी वाचकांच्या समोर आणलेली आहे.  मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांचे नाव होत आहे.          डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. त्यांची हयात गाव-खेड्यात गेल्याने अवती-भवतीचा परिसर, निसर्ग, राजकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेतीसंस्कृती यांचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी ते अस्वस्थ होतात.  याच अस्वस्थेतून त्यांचे लेखन होत असते.          प्रस्तुत 'कडेलूट' ही निसर्गावर होणाऱ्या मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणारी दमदार कादंबरी संस्कृती प्रक

कडेलूट - सचिन वसंत पाटील कर्नाळ-सांगली

*मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम मांडणारी कादंबरी: कडेलूट*                                  - सचिन वसंत पाटील          समकालीन मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांना ओळखले जाते. आजवर त्यांच्या प्रकाशित झालेल्या लाॅकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या बहुचर्चित कादंबऱ्यातून ते सिद्धच झाले आहे. त्यांची पहिली कादंबरी 'लॉकडाऊन' ही नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारामुळे त्याचे माणसांवर, मानवी मनावर, पशुपक्षांवर, एकूणच पृथ्वीवर, शेती संस्कृतीवर काय काय दुष्परिणाम झाले आहेत आणि कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? हे सांगणारी आहे. तर 'ऊसकोंडी' ही त्यांची दुसरी कादंबरी ऊस उत्पादक शेतकर्‍याचा संघर्ष मांडणारी आहे. साखर कारखानदार, मजूर आणि एकूणच व्यवस्था यांचं वास्तव चित्र रेखाटणारी आहे. तर गतवर्षी प्रकाशित झालेली 'पाणीफेरा' ही कादंबरी महापुरांमुळे हैराण झालेल्या माणसांचे दुःख समोर आणणारी आहे. नदीकाठच्या गावातील माणसांचे दुःख, व्यथा वेदना दाखवणारी आहे.         डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. अख्खी हयात गाव-ख