टिक टिक वाजतंया
टिक टिक वाजतंया डोक्यात
धडधड होतंया माझ्या उरात | धृ |
कसं सोडवू सांगा मी गणित
भीती वाटते हो माझ्या मनात |1|
इंग्रजी नाहीच हो मला येत
व्याकरण ही नाही हो सुटत | 2 |
करावे वाटे हो काम शेतात
अभ्यास शिरत नाही डोक्यात | 3 |
लक्ष सारं हो माझं खेळात
नुसत्या उचापती करण्यात | 4 |
Comments
Post a Comment