होय मीच सुजाता बोलतेय(२०१९) नाट्यछटा ६

होय मीच सुजाता बोलतेय(२०१९) 
माझ्या संसाराची राख रांगोळी झाली सारं होत्याचं नव्हतं झालं माझ्या उभ्या आयुष्यात असला पाऊस आणि असला महापौर मी पाहिला नाही काय करायचं मी कसं करायचं मला काही सुचत नाही सारा संसार उध्वस्त झालाय प्रपंचा उघड्यावर पडलाय घरादाराची पार वाट लावली या या पावसानं गोटा जनावराविना सुना सुना झालाय शेताचा सारा चिखल करून टाकलाय या महापुराण माझा संसार उघडा करून टाकलाय रडते काय म्हणतेस अर्ज रडू नको तर काय करू ग अगं ज्याचं जळतं त्याला कळतं या फोनला तर सांदाच नाही सारखा आपला वाजत असतो आणि सारखा सारखा एकच प्रश्न हॅलो हॅलो कोण बोलतोय हा होय होय मीच सुजाता बोलते होय होय तीच सुजाता आंबी अहो मग व्हिडिओ कॉल करायला लावायचा ना म्हणजे नुसता आवाज आला नसता तर मी सुद्धा दिसले असते त्या व्हिडिओतील सुजाता सारखीच बरं आता ठीक आहे थँक्यू थँक्यू फोन करून कौतुक केल्याबद्दल फोन ठेवते अगं सारजा असा सारखा फोन येतोय बघ अख्या महाराष्ट्रातून फोन यायला लागल्यात बघ सगळी कौतुक करतात पण किती जणांचा फोन घ्यायचा कुणाकुणाशी बोलायचं आणि तुला सांगतो सारजा काय म्हणून काय विचारतेस अगं फोनवरून विचार त्यात की काय ॲक्शन केली होतीस झक्कास लय भारी अगदी खरी खुरी वाटावी अशी काय म्हणत्यात तर आयुष्य पण ती वेळच तशी होती काय म्हणाले सरजी नाटक करण्यासारखी हा ग सारजे काळ काय वेळ काय आणि तू काय बोलतेस महापुराण सारा वेढा दिला होता अगदी भेटायचं स्वरूप आलं होतं गावाला आमचं घर स्वारी स्वारी बंगला आणि आजूबाजूचा परिसर तेवढा मोकळा होता बघ गावातली सारी जनावर आणून बांधली होती या रिकाम्या जागेवर सांगड केली होती जनावरांची एका लाईनीत ही अशी उभी होती जनावर आणि गावातली c200 माणसं होती आमच्या बंगल्यात बाकीची अगोदरच गेली होतीस सुरक्षित ठिकाणी पाणी येईल या भीतीनेच होय ग सर्जा या वर्षीच नवा बंगला बांधला होता आमच्या सासरी भवानी आमची चार कुटुंब चौघासाठी चार रूम चार किचन आणि मोठे मोठे चार हॉल हे सार दुसऱ्या मजल्यावर आणि खाली सगळे दुकान गाडी काढलेले आहेत काय म्हणाले सर जे चिखलीत बी लोक आमच्या बंगल्यात आली होती छे छे नाही ग ती काही आमच्या बंगल्यात आली नव्हती पण आमच्या बंगल्या जवळून त्यांची बोट मात्र जात होती 1989 च्या आणि 2005 च्या महापुराची सीमारेषा पार झाली होती सर्वांना आता पुराचे पाणी ओसरेल मग वसरेल असं वाटत होतं पाणी मागं सरेल असं वाटत होतं पण साऱ्यांचा अंदाज चुकला साप चुकला पावसाने काही उसण घेतलीच नाही पाच-सहा दिवस झाले पाऊस काही थांबेना पुराचे पाणी कमी होईना उलट वाढायला लागले साऱ्याचच धावताना पाणी हळूहळू इमारतीत शिरू लागलं आम्ही सुरक्षित आहोत ही भावना दुसर होऊ लागली पाणी वाटण्याची गती खूपच होती आता आम्हालाही बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता फोन सुरू झाले जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क सुरू झाला तुम्हाला नक्कीच बाहेर काढली जाईल पण अगोदर संकटात आहे त्यांना कारण तेथे पाणी आधी आले आहे पाण्याने खालचा मजला भरला जनावरांची डावी कापून त्यांना मुक्त केले एकदाची बोट आली घरातल्या बाहेरील माणसांना बोटीतून नेले पुन्हा बोट आली आमच्या घरातील सर्वजण त्या बोटीत बसलो आणि बोट निघाली काही अंतर जाताच एका झाडाजवळून बोट निघाली तर त्या झाडावर एक भला मोठा नाग फडा काढून झेप घेण्याच्या पावित्र्यात होता बोटीतील आर्मीवाल्या दादाचं लक्ष जाताच त्यांना वल्ल्याचा एक टिपरी दिला आणि त्या नागाला पाण्यात पडला त्याच वेळी मला पलूजवळ ब्रम्हनाळ येथे झालेल्या बोट दुर्घटनेची आठवण झाली त्या दहा-बारा लोकांना जलसमाधी मिळाली होती क्षणभर माझे भानारपले आपोआप माझे हात आर्मीवाल्या दादाच्या पायाकडे जाऊ लागले आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पहात होत
आर्मीवाल्या दादांना बोटीतल्या सगळ्यांना आधार देत सांगितलं की काही काळजी करू नका आपण सुरक्षित जात आहोत गेले चार दिवस आम्ही हेच काम करीत आहोत माझेच नव्हे तर अनेक लोकांचे प्राण या आर्मीवाल्या दादांनी वाचवले आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानत होते त्यांच्या पाया पडत होते आणि याच प्रसंगाचा कोणीतरी व्हिडिओ केला तो व्हायरल झाला आणि सगळीकडून फोन येऊ लागले ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला फोन केला त्यांची मी आभारी आहे ज्याने ज्याने पूरग्रस्तांची जी वाचवले आहेत त्या सर्वांना धन्यवाद येते आणि मला आता गेले पाहिजे कारण आर्मी ऑफिस मधून फोन आला आहे आर्मीवाल्या दादाला राखी बांधायची आहे आज रक्षाबंधनाचा सण आहे मी येते सारजा तुही चल की माझ्या संग आपण दोघी मिळून जाऊ चल चल

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी