वाचन एक छंद
वाचन एक छंद मला चांगलंच आठवतं की माझ्या लहानपणी गावात काही घरामध्येच लाईट आलेली होती. अनेक घरात दिवा, कंदील यांच्या प्रकाशातच वाचन, लेखन करावं लागायचं. आमच्याच घरी नव्हे, तर आमच्या गल्लीतही लाईट नव्हती. मी अभ्यासासाठी समोरच्या यशवंत बाबू पाटील (वकील) यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी दिवा घेऊन वाचन करत असलेला मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. वाचताना खाली वाकल्यानंतर माझ्या डोक्यावरील केसांना धग लागून चर चर आवाज झाल्याचे अजूनही आठवते. मी माझ्या मित्राबरोबर शाळेला प्रथमतः गेलो तो दिवस मला आठवतो. गावात बालपणी श्रावण महिन्यात पोथी-पुराणांचे वाचन व्हायचं. त्यावेळी आम्ही ते ऐकायला जात होतो. प्रसाद खायला मिळतो या आशेने अधिक जात होतो. त्यावेळी पांडवप्रताप, श्री विजय, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचले जात होते. ग्रंथाचा अर्थ सांगितला जात होता. त्यावेळी मला फारसे कळत नव्हते. पण मला वाचनाची गोडी लागण्या...