कठीण प्रसंग

                         *कठीण प्रसंग*

             माणिकपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात सुख समृद्धी नांदत होती. अशा छोट्याशा गावात बारा-तेरा वर्षाचा एक शाळकरी राजू नावाचा मुलगा होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. राजू शाळेत खूपच हुशार आणि इतर कामात चतुर होता. तो प्रामाणिक होता. राजूची आई ही साधी, सरळ आणि नाकासमोर चालणारी बाई. राजू लहान असताना राजूच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजूची आई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजुरी करायची. आपल्या घरचा खर्च ती बघत होती. अशा गरीब परिस्थितीमध्येही राजू आणि त्याची आई सुखाने जगत होती. राजूची आई राजूचा शाळेचा खर्च बघत होती. 
              एके दिवशी राजूची आई शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. शेतातल्या लोकांनी राजूच्या आईला घरी नेले. राजूला हे कळताच तो घाबरला. त्याच्याकडे आईला दवाखान्यात घेऊन जाण्यापुरतेही पैसे नव्हते. अगदी थोड्याशा पैशाने त्याच्या आईचा पूर्ण इलाज होणार होता. पण उपचारासाठी त्याच्याकडे तेवढेही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आजूबाजूंच्या लोकांची , गावकऱ्यांची मदत मागितली. पण त्याला कोणीही मदत करायला तयार झाले नाही. दिवसेंदिवस त्याच्या आईची तब्येत खूपच खालावत चालली होती. तो आपल्या आईजवळ गेला आणि आईला म्हणाला, "कोणताच गावकरी आपणाला मदत करायला तयार नाही. आपण आता काय करायचं?" यावर आई म्हणाली, "देवाला आपली काळजी." त्यावर राजू म्हणाला, "आई तू काही काळजी करू नकोस. मी काहीतरी काम करेन." त्याच्या आईला हे फारसं पटलं नाही तरीही तिने त्याला होकार दिला. 
                       दुसऱ्या दिवशी राजू सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामे आवरून शेतात काम करण्यासाठी निघाला. तो दुसऱ्याच्या शेतात सकाळी लवकर जाऊन काम करून घरी यायचा. कमावलेल्या पैशातून त्याने आईसाठी औषधे आणली. आईचं औषधपाणी करून तो शाळेत जात होता. तो सकाळी लवकर उठून शेतात जात होता. त्याने कमावलेल्या पैशातून आईसाठी औषधे आणत होता. आईची काळजी घेत होता. दररोज शाळेला जात होता. या औषधांच्या उपचारातून त्याची आई बरी झाली. राजूची आई नेहमीप्रमाणे शेतावर काम करण्यासाठी जाऊ लागली. राजूच्या काबाडकष्टामुळेच त्याची आई बरी झाली होती. 
               सार्‍या गावकऱ्यांना कळून चुकले की आपण कठीण प्रसंगात एकमेकांना मदत केली पाहिजे. गावकर्‍यांचे डोळे उघडले. सर्व गावकऱ्यांनी राजूचे कौतुक केले. सर्वांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली.  पुढे याच गावकऱ्यांच्या मदतीने राजू खूप शिकला. त्याने ठरवले की आपण गावकर्‍यांना विसरायचे नाही. म्हणून त्याने गावाच्या प्रगतीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असा निर्धार केला. त्याने गावाच्या विकासासाठी मोठ्या शहरात न जाता आपल्या गावी शिक्षकाची नोकरी सुरू केली. 

    गौरी तानाजी कुंभार
    इ. १० वी
   श्री नवनाथ हायस्कूल, 
   पोहाळे तर्फ आळते
   ता. पन्हाळा जि.कोल्हापूर
मोबा.  93092 55530

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील