कष्टाचे फळ

                 आटपाटनगर नावाचं एक गाव होतं. त्या गावातील सारे लोक सुखी, समाधानी, आनंदी होते. त्या गावाच्या विकासाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्या गावातील शाळा. त्या शाळेचे नाव होते विद्यामंदिर आटपाटनगर.                                           एके दिवशी त्या गावात शामराव नावाचा एक माणूस आपल्या परिवारासह बकरी घेऊन आला होता. तो दररोज आपली बकरी घेऊन एका शेतकऱ्याच्या रानामध्ये बसवत होता. एकदा त्या शाळेच्या समोरील रानात त्याने आपली बकरी बसवली होती. ते रान त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे होते. शामरावचा मुलगा राम. त्याला या भटक्या जीवनामुळे शाळा शिकता येत नव्हती. पण तो बुद्धीने तल्लख होता. दुसऱ्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक पाटीलसर आपल्या रानात आले होते. तेव्हा शामराव त्यांना म्हणाला, "काय सर, कशी आहे तुमची शाळा ?" त्यावर पाटीलसर म्हणाले, "चांगली आहे शाळा. शाळेमध्ये मुले येतात. त्यांना आम्ही मन लावून शिकवतो. मुले चांगली शिकतात. त्यामुळे आमच्या गावातील अनेक मुले वेगवेगळ्या मोठ्या अधिकारपदावर  आहेत." तेव्हा बाजूला बकरीबरोबर खेळत असलेला राम आपल्या बाबाला म्हणाला, "हे बघ बाबा. मीपण शाळा शिकणार. मोठा अधिकारी होणार." तेव्हा शामराव त्याला म्हणाले, "अरे बाबा, तुला शिकवता येणार नाही मला. आपली ही भटकंतीची अवस्था. आज या गावात तर उद्या त्या गावात जाऊन बकरी बसवावी लागतात. आणि तुला शिकवण्याएवढी माझी परिस्थितीही नाही." शामरावचं बोलणं मुख्याध्यापक पाटीलसर ऐकत होते. तेव्हा त्यांच्या मनात विचार आलाय. ते शामरावला म्हणाले, "हे बघा. तुम्ही या गावात किमान दहा पंधरा दिवस राहणार आहात. तेव्हा आमच्या शाळेत पाठवून द्या तुमच्या मुलाला. मी त्याला शिकवतो. या गोष्टीला तुझी काही हरकत नाही ना शामराव?"               त्यावर शामराव म्हणाला, "सर आम्ही अडाणी माणसं. आम्हाला त्याचं काय कळते. तुम्ही म्हणताय तसं. मी त्याला पाठवून देईन शाळेत. पण त्याला शिकवण्यासाठी माझ्याकडं एवढं पैसे नाहीत." तेव्हा पाटीलसर त्याला म्हणाले, "तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना! तुम्ही त्याच्या शिक्षणाच्या पैशाची काही काळजी करू नका. ते सर्व मी पाहतो. तुम्ही गावोगाव फिरण्यापेक्षा या गावातच स्थायिक व्हा. तुम्हाला या गावात घरकुल मिळवून देतो. सरपंचाना याबाबत सांगतो." हे सारे संभाषण ऐकून रामला खूप आनंद झाला. 
               दुसऱ्या दिवशी शामराव रामला शाळेत घेऊन गेला. पाटीलसरांनी गुलाब पुष्प देऊन दोघांचे स्वागत केले. आणि वयानुसार रामला इयत्ता आठवीच्या वर्गात प्रवेश दिला.                         राम मुळात हुशार असल्यामुळे त्याला शिकण्यात काही अडचण आली नाही. शिवाय तो मन लावून अभ्यास करायचा. घरी अभ्यास करायचा. त्याची चिकाटी पाहून पाटीलसरांनी त्याला आठवीच्या एन. एम. एम.एस.परीक्षेला बसवलं. आणि काय आश्चर्य? त्याचा त्या परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक आला. त्याला महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे बारावी परीक्षा होईपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार होती. रामने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत आपल्या केंद्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला. त्याने पाटीलसरांचा विश्वास सार्थ केला. राम खूप शिकला. तो एका बँकेमध्ये नोकरीला लागला.
                 कष्टाचे फळ हे नेहमी चांगलेच मिळत असते.  'कष्टाविना फळ नाही' असे म्हणतात हे रामच्या अनुभवावरून आपणाला मान्यच करावे लागेल. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की 'कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचेन.' आपण कर्म करत राहायचं, यशाची अपेक्षा करायची नाही. यश हे आपोआपच मिळत राहते. 
चंद्रकांत सागर बोरचाटे
 इयत्ता दहावी 
श्री नवनाथ हायस्कूल 
पोहाळे तर्फ आळते 
तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर 
मोबा. नं. 87671 02400

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी