स्नेहसंमेलन

सर, तुमचं आपलं काहीतरीच! अहो, मला कसला अभिनय जमणार? माझं नाव घेऊ नका तुमच्या स्नेहसंमेलनाच्या नाटकात. त्यापेक्षा मी गाणं म्हणू का? काय म्हणता? चालेल. अहो, पण त्यासाठी चांगला पेटीवाला पाहिजे. ढोलकीवाला पाहिजे. तरच माझं गाणं चांगलं होईल. वा रे वा! आमच्या शाळेचा पंचमदा. अरे तूच केशव आमच्या शाळेचा पंचमदा. काय म्हणलास रे तुका? सा कशाशी खातात हे त्याला माहीत नाही. म्हणे पेटी वाजवणार. काय बाळू, काय म्हणतोयस? पेटी वाजवणे म्हणजे जत्रेतला भोंगा वाजवण्यासारखं सोप्प वाटलं का? त्याचं ते काम नाही. असं कसं म्हणतोस रे. अरे, त्याने तर संगीताच्या चार परीक्षा दिल्या आहेत. खरंच दिले आहेत. पण पास कुठे झाला? तरी पण त्याला संगीतातलं काहीतरी कळत असेलच ना. काय म्हणालात, आमचा श्याम? तबला कसा वाजवतो तो माहिती आहे का? ताक धिना धिन ताक, ताक धिना धिन ताक. बघा कसा डबा वाजत बसलाय तो जेवणाचा. यालाच म्हणतात की असावे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोव्हे. दररोज त्याचा सराव असतो मेहनत असते खरं तर हे सारे त्याच्या कानातच बसले आहे. आणि आमची राधी, हो हो आमची राधी कशी गाते, ऐकलं का कधी? नाही? मग सांगू मी. मग एका तर तिचं फेव्हरेट गाणं - 'लकडी की काठी, काठी का घोडा, घोडे की धूम पे मारा हातोडा' 'लकडी की काठी, काठी का घोडा, घोडे की धूम पे मारा हातोडा' वा वा वा. फारच छान असं म्हणताय तुम्ही. अहो तिचं गायन श्रेष्ठ आहे. काय म्हणताय? हे झालं राष्ट्रभाषेतलं. आता राज्यभाषेतलं पाहिजे. बरं. बरं. म्हणतो आता. देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश. सूर्य देतो सुंदर चांदण्या. चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे. काय झकास गाणे आहे हे. काय सर, दुसरे गाणी म्हणणार आहेत. मग मी भाग घ्यायचा नाही त्यात. मी नाटकातच भाग घेतला पाहिजे. असं कसं सर त्यापेक्षा मी विनोद सांगू? सारी पोरं हसून हसून बेजार होतील. उगीच मला माझे मित्र दादा म्हणतात का?  अहो दादा म्हणजे दादा कोंडके हो. एक होती मुंगी ती गेली हत्तीला भेटायला. हत्ती नदीत अंघोळ करत होता. ती त्याला म्हणाली, "हत्तीदादा हत्तीदादा वर जरा येता का?" हत्तीने विचारले, "का ग बाई?" मुंगी म्हणाली, "तुम्हाला चड्डी शिवायची आहे माफ घ्यायला बाहेर या." बघा बघा कशी सगळी बिंदी फिदी हसायला लागलीत. असं काय करताय सर? असं पांचट विनोद नकोच. मग काय करू? नाटकात भाग घेऊ? बरं बुवा. तर मग ऐका, "टू बी ऑर नॉट बी दॅट इज द क्वेश्चन. आता जगावं की मरावं हा एकच सवाल आहे........ अरे वा! काय जबरदस्त झाला आहे माझा अभिनय. मग घेतोच मी नाटकेत काम. पण रोल कोणता आहे ते समजलं तर बरं होईल. होय सर. तुम्ही लिहिलेल्या नाटिकेत भाग घ्यायचा. काय म्हणताय अलीबाबा आणि चाळीस चोर या नाटकातील 40 व्या चोर असतील भूमिका करायची. खरं आहे तुमचं मेकअप करायला नको ड्रेपरी नको बरणीत बसला काय नाही बसला काय तरी चालते अरे वा वा वा मग मी भाग घेतोच.

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील