Posts

Showing posts from May, 2026

म्हणे आता घंटा वाजवा (नाट्यछटा)

अहो, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय! माणसांची गर्दी नव्हे, ही तर गाढवांची गर्दी आहे असं तुम्हांला वाटते? असं का म्हणताय तुम्ही? पण इतकी माणसं का उभी राहिलीत म्हणायचीत? अहो, आता वाजलेत किती? नऊ! म्हणजे नऊ वीसची बस आहे ही. आता सुटेल लगेच. त्यानंतर पुन्हा बस नाही असं कोण म्हणालं म्हणायचं? आलेपाक घ्या, लेमण गोळ्या घ्या, भडंग घ्या, पाण्याची बॉटल घ्या असं म्हणणाऱ्यांनो, तुम्ही खाली उतरा. अहो तुम्ही खाली उतरा अगोदर. गर्दी किती झाली दिसत नाही का तुम्हाला?  तिकीट, तिकीट. बोला तिकीट. कोणाचं द्यायचं राहिलं असेल तिकीट घ्या आधी.  अहो सुट्टी पैसे काढा अगोदर, सगळे येतात ते नोटाच बाहेर काढतात. कुणाकुणाला आणि किती किती मोड द्यायची! सुट्टे पैसे काढा. अहो, किमान वरचे तरी सुट्टै पैसे काढा. काय म्हणताय? सुट्टे पैसे आणणार कुठून?  आणि देणार कसे? अहो, मग आम्ही काय करायचं? रुपया, दोन रुपये, पाच रुपये कुठून द्यायचेत?  प्रत्येक जण 100-500 रुपयांच्या नोटा काढताय. आम्ही काय सुट्ट्या पैशांचा कारखाना काढला आहे का आम्ही? मागंल त्याला सुट्टे पैसे द्यायला! अहो, काय म्हणताय तुम्ही? अहो, काय झालंय? गा...