Posts

Showing posts from January, 2026

आजचा तरुण व स्पर्धा परीक्षा

*आजचा तरुण व स्पर्धा परीक्षा*          आदरणीय व्यासपीठ, ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोतेहो. ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीवर आचार्य अत्रे यांच्या झेंडूच्या फुलांनी सारा सुगंध पसरला. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ वाचून अख्खा महाराष्ट्र खदखदून हसला. आज याच माय भूमीवर आणि क्षितिजावर पुन्हा एकदा असेच दैदीप्यमान आणि दिव्य तारे जन्मावेत, चमकावेत याच ध्येयाने प्रेरित होऊन संयोजकांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत म्हणून नवनाथ हायस्कूल पोहाळेची विद्यार्थिनी, आपल्यासमोर विषय मांडत आहे 'आजचा तरुण आणि स्पर्धा परीक्षा'             पूर्वीचे युग निघून गेले आणि स्पर्धा परीक्षांचे युग आले. मानवात बदल झाला. स्पर्धेत मानव गुंतला गेला. स्पर्धा परीक्षा..स्पर्धा परीक्षा....म्हणजे नेमके काय हो? स्पर्धा परीक्षा म्हणजे हारणं किंवा जिंकणं, पास होणे किंवा नापास होणे असा अर्थ आहे का हो? स्पर्धा परीक्षा होणे गरजेचे आहे का हो? आजकालचे युग आहे ते धावते युग आहे. या धावत्या युगामध्ये कोण, कुठल्या स्थानावर आहे. हे कळणं खूपच महत्त्वाचे आहे. पण स्पर्धा कोणाची, कोणाशी अ...

मला हवेत आजी आजोबा

        'देव जरी मज कधी भेटला           माग हवे ते माग म्हणाला          म्हणेन प्रभू दे......' खरंच! खरंच!! जर देव आमच्या घरी आला आणि म्हणाला, की हवे ते माग.           तर आमच्या घरातील काय मागतील माहिती आहे ? अहो, माझे पप्पा काय मागतील माहित आहे तुम्हाला? ते म्हणतील की, देवा मला प्रमोशन दे. कारण त्यांना कारकुनाचे ऑफिसर व्हायचं आहे. आणि मम्मी काय मागेल? अहो ती आपल्याला कार मागे ल. कारण तिला फिरायची फार हौस आहे. आणि दादा काय मागेल? बरोबर. तुम्ही बरोबर ओळखलंत. तो मोबाईल किंवा काॅम्प्युटर मागेल. कारण त्याला गेमने खेळायचा फार नाद आहे. पण मला यातलं काहीच नको. मी मात्र मागेन  आजी आजोबा. हो मला हवेत आजी आजोबा. आजच्या या सिमेंटच्या . हो हो ही सिमेंटचीच जंगले आहेत. यांना घर कोण म्हणेल? या नुसत्या भिंतीच आहेत. यात प्रेमाचा ओलावा मुळीच नाही. या सिमेंटच्या जंगलात टी.व्ही., कॉम्प्युटर, फ्रीज, कुलर अशा निर्जीव वस्तूंना ठेवायला जागा आहे. पण माझ्या आजी-आजोबांना राहायला नाही.       ...