आजचा तरुण व स्पर्धा परीक्षा

*आजचा तरुण व स्पर्धा परीक्षा* 
        आदरणीय व्यासपीठ, ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोतेहो. ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीवर आचार्य अत्रे यांच्या झेंडूच्या फुलांनी सारा सुगंध पसरला. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ वाचून अख्खा महाराष्ट्र खदखदून हसला. आज याच माय भूमीवर आणि क्षितिजावर पुन्हा एकदा असेच दैदीप्यमान आणि दिव्य तारे जन्मावेत, चमकावेत याच ध्येयाने प्रेरित होऊन संयोजकांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत म्हणून नवनाथ हायस्कूल पोहाळेची विद्यार्थिनी, आपल्यासमोर विषय मांडत आहे 'आजचा तरुण आणि स्पर्धा परीक्षा'
            पूर्वीचे युग निघून गेले आणि स्पर्धा परीक्षांचे युग आले. मानवात बदल झाला. स्पर्धेत मानव गुंतला गेला. स्पर्धा परीक्षा..स्पर्धा परीक्षा....म्हणजे नेमके काय हो? स्पर्धा परीक्षा म्हणजे हारणं किंवा जिंकणं, पास होणे किंवा नापास होणे असा अर्थ आहे का हो? स्पर्धा परीक्षा होणे गरजेचे आहे का हो? आजकालचे युग आहे ते धावते युग आहे. या धावत्या युगामध्ये कोण, कुठल्या स्थानावर आहे. हे कळणं खूपच महत्त्वाचे आहे. पण स्पर्धा कोणाची, कोणाशी असावे हेही तितकंच महत्वाचे आहे. मी तुम्हाला एक जीवनाचं सत्य सांगेन. ते सत्य असे आहे, की ज्या वेळेला आपण जन्माला आलो, जन्माला येण्याच्या आधी आपण स्पर्धा परीक्षा खेळलो होतो. तुम्ही म्हणाल, ते कसं? तर लाखो स्पंब ज्या वेळेला झगडले गेले. आणि त्यातील एक स्पंब जिंकला. तो आईच्या गर्भामध्ये रुजू झाला. मग नवजात बालकाचा जन्म झाला. याप्रमाणे जन्माला येतानाच आपलीही स्पर्धा परीक्षा सुरू झाली होती. 
         जशा नाण्याला दोन बाजू असतात. तशा स्पर्धा परीक्षांना दोन बाजू आहेत असं मला वाटतं. त्या बाजू म्हणजे जिंकणं किंवा हरणं. जो व्यक्ती या स्पर्धा जिंकत असतो. तो त्याची स्वप्नं, स्वतःचे ध्येय, स्वतःच्या आशाआकांक्षा पूर्ण करतो. स्पर्धा परीक्षेच्या आधारे आपले जीवन मार्गाला लावतो. पण जो या स्पर्धा हरतो, तो या स्पर्धांचा सारासार विचार करून पुन्हा नव्या उमेदीने उठतो. या स्पर्धाकडे, परीक्षाकडे धावू लागतो. पहिल्यापेक्षा अधिक गतीने अभ्यास करतो. आपण आपल्या स्वतःशीच स्पर्धा करतो. तेव्हाच आपण खरा स्पर्धक  बनू शकतो. तीच आपली खरी पहिली स्पर्धा असेल, जर आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो, तर जगात अशी कोणतीच स्पर्धा उरणार नाही की ती आपण देऊ शकणार नाही आणि जिंकू शकणार नाही. 
          जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला अनेक स्पर्धा द्याव्या लागतात. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना दुष्काळ, पावसाची पहावी लागणारी प्रतीक्षा, अवकाळी पडणारा पाऊस ही सर्व संकटे शेतकऱ्यांसाठी स्पर्धा असतात. 
            प्रत्येक गोष्टीत आपण स्पर्धा करीत असतो. परंतु आपण या स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी देत आहोत असं समजणं चुकीचं आहे. आपण सर्व स्पर्धा जिंकायच्या ध्येयाने करतो हे अगदी बरोबर असले, तरी आपल्यातील तो आत्मविश्वास अहंकर, गर्व बनता कामा नये. आपल्यात अहंकार, गर्व निर्माण झाला तर ही स्पर्धा आपण हरतो. आणि दुसर्‍या स्पर्धेत भाग घेताना आपला आत्मविश्वास कमी होतो. आपल्या मनात अनेक शंका निर्माण होतात. की मी पुन्हा हरणार तर नाही ना! म्हणून आपण प्रत्येक स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरायला हवे. अहंकाराने किंवा गर्वाने उतरायचं नाही. म्हणून मला म्हणावेसे वाटते, 
         अहंकार करू नको, करू नकोस तू गर्व 
           आत्मविश्वासाने आता जिंक स्पर्धा सर्व
स्पर्धा परीक्षामुळे कितीतरी पी. एस. आय., ऑफिसर्स, कलेक्टर, डॉक्टर्स आपल्याला मिळाले आहेत. स्पर्धापरीक्षा या वेगळ्या पद्धतीचे आहेत बँकिंग क्षेत्र क्रीडाक्षेत्र कलाक्षेत्र रेल्वे अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात यातूनच अमिताभ बच्चन सारखे कलाकार लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका अजय अतुल सारखे संगीतकार निर्माण झालेले आहेत
इतिहास म्हटला की डोळ्यासमोर येणारी पहिली व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी पंधराव्या वर्षी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यावेळी त्यांना अनेक संकटे आली पण त्यांनी माघार घेतली नाही त्याचप्रमाणे त्यांनी अफजल खान वध शाहिस्तेखानाची बोटे छाटणे आग्र्याहून सुटका अशा अनेक संकटातून पार जाताना नियोजनबद्ध त्याने संकटांचा सामना केला आहे त्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा दण्यासाठी नियोजनबद्ध
प्रयत्न आपण का करू शकत नाही साध्या कळीलाही फुलपाखरू बनण्यासाठी अनेक टप्प्यातून जावे लागते फुलपाखरू बनण्यासाठी ही आळी संघर्ष करत असते बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण कवितेमध्ये लिहिली आहे की पक्षांना फक्त तोच असते पण मानवाला दोन हात असतात दहा बोटे असतात पक्षी चौकशीच्या आधारे घरटे बांधतात अन्न शोधून आणतात ही केवळ तुळशीचे आधारे करतात पण मानवाकडे सर्व अवयव आहेत तरीपण मानव संकटांना घाबरतो स्पर्धा परीक्षेला घाबरतो म्हणून आपण न घाबरता शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिले पाहिजे म्हणून आजचा तरुण स्पर्धा परीक्षेला वळला आहे त्याचा त्याला चांगला फायदाही झालेला दिसून येतो पूर्वी भारतातील दक्षिणेकडील राज्य किंवा उत्तरेकडील राज्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत होती पण आज आपल्या महाराष्ट्रातील अनेक तरुण या स्पर्धा परीक्षा ठेवल्यामुळे या स्पर्धेच्या युगात मोठ्या संख्येने पास होत आहेत जयश्री जाधव राजेंद्र भारूड दिगंबर प्रधान विश्वास नांगरे पाटील या सारखे अनेक तरुण पोलीस खात्यामध्ये उच्च पदावर ती कार्यरत आहेत म्हणून आजचा तरुण व स्पर्धापरीक्षा यांचं नातं अतूट आहे म्हणून मी शेवटी एवढेच म्हणेन स्वप्नासाठी लईच झुरावं लागतं लईच पडावं लागतं तुला वाटतं एकच परीक्षा देईन एकदाच प्रयत्न करेन आणि महाराष्ट्र शासनाची गाडी आणि हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही आणि शासनाची गाडी मिळवणं भाऊ हे एवढं सोपं आहे म्हणूनच स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी करून आपण निश्चित यश मिळू शकतो याची मी या ठिकाणी काही देईल

Comments