Posts

Showing posts from March, 2026

मिलिंद यादव यांचेविषयी माहिती

*मा. श्री. मिलिंद यादवसर* मा. श्री. मिलिंद यादवसर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. जे आपल्या मनाला पटेल तेच ते करतात. त्यांनी शिवाजी हायस्कूल, कोल्हापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केले आहे. त्या वेळेला त्यांनी आपल्या शाळेतील मुलांना अनेक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दाखवले आहेत.  त्याचबरोबर २०/२५ वर्षापूर्वी शहरातील शाळेमध्ये मुलं व मुली यांना वर्गात एकत्र बसवण्याचे धाडस दाखवले होते. ते मार्क्सवादी विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आपणाला आवडेल त्याच पद्धतीने ते वागले आहेत. लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. मुसाफिर हा शब्द सरांच्या बाबतीत तंतोतंत योग्य आहे.   *राबणारे हात*  *डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया*   *नेपाळ प्रवासावर आधारित पुस्तक*  लिहिले आहेत.  त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणते चित्रपट पाहावेत आणि ते कसे पाहावेत याविषयी जागृती करणारी *चिल्लर पार्टी* नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. महानगरपालिकेच्या शाळा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी वस्त्यावरील शाळा की जिथे चि...