मिलिंद यादव यांचेविषयी माहिती

*मा. श्री. मिलिंद यादवसर*

मा. श्री. मिलिंद यादवसर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. जे आपल्या मनाला पटेल तेच ते करतात. त्यांनी शिवाजी हायस्कूल, कोल्हापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केले आहे. त्या वेळेला त्यांनी आपल्या शाळेतील मुलांना अनेक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दाखवले आहेत.  त्याचबरोबर २०/२५ वर्षापूर्वी शहरातील शाळेमध्ये मुलं व मुली यांना वर्गात एकत्र बसवण्याचे धाडस दाखवले होते. ते मार्क्सवादी विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आपणाला आवडेल त्याच पद्धतीने ते वागले आहेत. लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. मुसाफिर हा शब्द सरांच्या बाबतीत तंतोतंत योग्य आहे. 
 *राबणारे हात* 
*डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया* 
 *नेपाळ प्रवासावर आधारित पुस्तक*  लिहिले आहेत.
 त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणते चित्रपट पाहावेत आणि ते कसे पाहावेत याविषयी जागृती करणारी *चिल्लर पार्टी* नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. महानगरपालिकेच्या शाळा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी वस्त्यावरील शाळा की जिथे चित्रपट म्हणजे काय हे माहीतच नाही अशा शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले आणि योग्य चित्रपट दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे.
 त्याचबरोबर होळीमध्ये टाकलेल्या पोळ्या दान करण्याचे महान काम त्यांनी केले आहे. त्या संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांची एक समितीच निर्माण केली आहे.  त्याद्वारे ते आजही काम करत आहेत.
 त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. त्यातूनच त्यांनी अनेक पक्षांची छायाचित्रणे काढलेली आहेत. त्यांना सायकल रायडींग छंद असल्यामुळे खूप दूरपर्यंत त्यांनी सायकल प्रवास केलेला आहे. ते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे मानसपुत्र आहेत. तर सुनीलकुमार लवटे, बी. एम. हिर्डेकर, श्रीपाद सबनीस अशा महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. भारत आणि भारताबाहेर त्यांनी प्रवास केलेला आहे. 
घर काम करणाऱ्या स्त्रियांच्या हितासाठी अनेक मोर्चे काढले आहे त. त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
असे बहुविध व बहुआयामी व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

बोलतो मराठी

देणाऱ्याने देत जावे.......

१२.चूक एकदाच होते---कथा