Posts

Showing posts from June, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज*        महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा देणारे आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखले जाते ते महाराष्ट्रातील लोकोत्तर पुरुषांपैकी एक असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज दि. २६ जून २०२६ रोजी १५२ वी जयंती.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा वेध घेत मी त्यांना मानाचा मुजरा करतो.         पारतंत्र्याच्या काळात या स्वयंभू राजपुरुषाने इंग्रजी सत्तेचे जोखड मानेवर असतानाही स्वतःचे सत्व अबाधित  राखत मानवतेच्या भूमिकेतून प्रजाजनांचे कल्याण आणि हित रक्षण करीत राज्य कारभार केला.       राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जी ध्येय धोरणे राबविली, प्रजेच्या हिताचे जे क्रांतिकारक निर्णय  घेऊन अंमलात आणले ते स्वातंत्र्योत्तर काळात  केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील राज्यकर्त्यांसाठी पथदर्शक ठरले.       १ मे १९६० रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र  राज्याची निर्मिती झाली. तेव्हा त्यांनी  "या राज...

स्नेहसंमेलन

सर, तुमचं आपलं काहीतरीच! अहो, मला कसला अभिनय जमणार? माझं नाव घेऊ नका तुमच्या स्नेहसंमेलनाच्या नाटकात. त्यापेक्षा मी गाणं म्हणू का? काय म्हणता? चालेल. अहो, पण त्यासाठी चांगला पेटीवाला पाहिजे. ढोलकीवाला पाहिजे. तरच माझं गाणं चांगलं होईल. वा रे वा! आमच्या शाळेचा पंचमदा. अरे तूच केशव आमच्या शाळेचा पंचमदा. काय म्हणलास रे तुका? सा कशाशी खातात हे त्याला माहीत नाही. म्हणे पेटी वाजवणार. काय बाळू, काय म्हणतोयस? पेटी वाजवणे म्हणजे जत्रेतला भोंगा वाजवण्यासारखं सोप्पं वाटलं का? त्याचं ते काम नाही. असं कसं म्हणतोस रे. अरे, त्याने तर संगीताच्या चार परीक्षा दिल्या आहेत. खरंच दिल्या आहेत. पण पास कुठे झाला? तरी पण त्याला संगीतातलं काहीतरी कळत असेलच ना. काय म्हणालात, आमचा श्याम? तबला कसा वाजवतो तो माहिती आहे का? ताक धिना धिन ताक, ताक धिना धिन ताक. बघा कसा डबा वाजत बसलाय तो जेवणाचा. यालाच म्हणतात की असावे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोव्हे. दररोज त्याचा सराव असतो. मेहनत असते. खरं तर हे सारे त्याच्या कानातच बसले आहे. आणि आमची राधी, हो हो आमची राधी कशी गाते, ऐकलं का कधी? नाही? मग सांगू मी. मग एका तर तिचं फेव्...