बालसाहित्य आणि संस्कार

वरणगे गावात साहित्य संमेलन आयोजित केले होते. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर होते. या साहित्य संमेलनामध्ये श्याम कुरळे, रा. तु. भगत, किसनराव कुराडे, प्रा. दिनकर पाटील अशी नामवंत साहित्यिक मंडळी होती. त्यावेळी ग्रामीण लोकांमध्ये चर्चा चालली होती. "साहित्य म्हणजे काय रे भाऊ?" अशिक्षित लोकांना याबाबत काय माहिती असणार? ते आपल्या परिचयाच्या वस्तूंची नावे सांगत होती. एक गावकरी म्हणाला, "खोरं, टिकाव, पाट्या इत्यादी"
 दुसरा गावकरी म्हणाला, "तसलं नव्हं रं बाबा. ते आपलं शेतकऱ्याचं शेतात काम करण्याचं साहित्य असतंया." "मग कसलं असतं रे साहित्य?" पहिल्याचा प्रश्न.
त्यावर दुसरा म्हणाला, "अरे बाबा, आपलं शिंदे गुरुजी आहेत नव्हं! त्यांच्या डोक्यात जे विचार येतात, ते कागदावर लिहून काढतात. त्याला साहित्य म्हणतात." 
               साहित्यामध्ये कथा कविता नाटक निबंध असे विविध प्रकार असतात. मनोरंजन हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. त्यातूनच ज्ञान आणि प्रबोधन करणे हे योगानेच येते. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्य करत असते.
               प्रौढ साहित्य आणि बालसाहित्य असे ढोबळमानाने साहित्याचे दोन प्रकार पडतात. मोठ्या लोकांना मनोरंजन, प्रबोधन आणि कामाच्या व्यापातून विरंगुळा म्हणून साहित्याची आवश्यकता भासते. तर बालसाहित्य हे लहान मुलांना मनोरंजनाबरोबरच ज्ञान संपादन करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. साहित्य हे मनुष्याला घडविण्याचे एक माध्यम आहे. 
               प्रौढ साहित्य अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकांनी लिहिलेले आहे. बालसाहित्याचे लेखन तसे कमी प्रमाणात झाले आहे. प्रौढ साहित्य लिहिणे तसे अवघड वाटत नाही; पण बालसाहित्य लिहिणे हेही सोपे वाटत नाही. 
              बालसाहित्याचा प्रारंभ काळ इ. सन १८०६ ते इ. सन १८५० मानला जातो. त्या काळातील बालसाहित्य स्वतंत्रपणे लिहिलेले किंवा ग्रंथ रूपात लिहिलेले नव्हते. ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध - जैन काळापर्यंत म्हणजे पाच ते सहा हजार वर्षापर्यंत प्राणीकथा, जातककथा, पंचतंत्र, हितोपदेशकथा यातून मनोरंजन आणि नीती शिक्षण दिले जात होते.
               १८५० ते १९४७ पर्यंत बालसाहित्य निर्माण झाले. त्यावर इंग्रजी भाषेतील साहित्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे पंचतंत्र, इसाफनीती अशा संस्कारक्षम साहित्याचा प्रभाव दिसून येतो. 
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सभा पुणे या संस्थेने १९७५ सालापासून साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. त्याच्या नावातील काही बदल आणि काही वेळा संस्था संस्थगित करण्यात आली होती. पण बालसाहित्य चळवळ वाढविण्याचे महान कार्य या संस्थेने आजतागायत सुरू ठेवलेले आहे. 
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर ही संस्था सन १९९२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झाली. 'करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थेची मुहुर्तमेढ रा. वा. शेवडेगुरुजी यांनी रोवली होती. श्याम कुरळेसर, प्रा. टी. आर. गुरवसर, वसंतराव निगवेकर, मुकुंदराव निगवेकर, शशिकांत महाडेश्वर, रजनी हिरळीकर डॉ. लीला पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती. मराठी बालकुमार साहित्य सभेने आजवर मुलांच्यासाठी बालसाहित्य लिहिण्याचे महान कार्य केलेले आहे. या सभेच्या वतीने मुलांच्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. कथालेखन, काव्यलेखन, निबंध लेखन यांच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. मुलांना सृजनशील बनवून त्यांच्यातून काही प्रतिनिधिक स्वरूपात कथासंग्रह व कवितासंग्रह निर्माण केलेले आहेत. आज या संस्थेने बालसाहित्याला मूर्त स्वरूप दिलेले आहे. मुकुंदराव निगवेकर यांनी जंगल आणि प्राणी यांच्या माध्यमातून मुलांच्या वरती संस्कार करणाऱ्या कथा लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर शशिकांत महाडेश्वर यांनी संस्कारक्षम बोधपर कथा लिहिलेल्या आहेत. रजनी हिरळीकर, श्याम कुरळे यानी बालसुलभ कविता लिहिलेल्या आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांनी सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल ही बालकादंबरी व झाडोरा कवितासंग्रह यातून मुलांच्या वरती संस्कार बिंबवण्याचे काम केलेले आहे. गोविंद गोडबोले यांनी चॉकलेट बुक नावाची बुक सिरीज सुरू करून लाखावर पुस्तक विक्री केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध वर्तमानपत्रातून साप्ताहिक बोधकथा लिहिलेल्या आहेत. मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी मुलांच्यासाठी शाळा शाळांमधून जाऊन कथाकथनाची आणि काव्य लेखनाची कार्यशाळा घेतलेली आहे. मुलांना प्रेरणा द्यायची हे कार्य केलेले आहे. संभाजी चौगले,  नसीम जमादार, प्रणिता तेली, परशराम आंबी, कमल कुरळे, रवींद्र खैरे, संदीप व्हनाळे, गायत्री माळी यासारख्या नवलेखकानी मुलांच्यासाठी संस्कारक्षम लेखन करून मुलांना प्रोत्साहित करण्याचे कार्य केलेले आहे.  खरंच आज मुलं वाचत नाहीत असे म्हटले जाते ; पण मला हे पटत नाही. आज नवीन मुलंसुद्धा प्रतीत यश लेखन करताना दिसत आहेत. यामध्ये वैष्णवी सुतार (उंड्री) मोहर काव्यसंग्रह, अनिकेत सुतार यासारखी मुलंही संस्कारक्षम, दर्जेदार साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत.
             लहान मुलं ही संस्कारक्षम असतात. हे वय संस्कार होण्याचे असते. त्यांच्यावरती पुस्तकातून संस्कार होत असतात. म्हणून बालसाहित्य लिहिणे अत्यावश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. आमच्या लहानपणी चांदोबा किशोर यासारखी मासिके होती. आजही किशोर मासिक प्रभावशाली निघत आहे. मन, मनगट आणि मस्तक घडवायचं असेल तर पुस्तकेच घडवू शकतात. म्हणून मुलांसाठी संस्कारक्षम पुस्तके लिहिणे आवश्यक आहे. आजही बाल साहित्यिक सुंदर संस्कारक्षम आणि मुलांच्या विचारणा प्रेरणा देणारी पुस्तके लिहीत आहेत.
               मुलांमध्ये विकास आणि संस्कार असणे आवश्यक आहे असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये अनुकरणशीलता आणि कल्पनाशक्ती मोठ्या प्रमाणात असते. त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. चारित्र्याचा विकास होतो आणि ज्ञान वाढते. जग जाणून घेण्याची इच्छा व्यक्त होते. याच वयात मुलांचे जडणघडण होते. त्यासाठी चांगल्या साहित्यातून चांगले विचार मुलांच्या मनावर बिंबवले जातात आणि मुले विचार सुदृढ होत असतात. मौखिक विचारांतून आणि बडबडगीतांतून मुलांचे भावविश्व व्यापक होत जाते. शाळेत गेल्यावर बालगीतातून मुलाचे आयुष्य घडत जाते. अशावेळी संस्कारक्षम कविता आणि कथा त्याच्या वाचनात येतात. त्यातून एकप्रकारे मूल विकसित होत जाते. 
             "बालमनाला स्पर्श करणारी आणि त्याच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तीदायक गोष्ट म्हणजे बालसाहित्य" असे मालती दांडेकर म्हणतात. 
"बाल मनाच्या गरजा, मर्यादा आणि अपेक्षा लक्षात घेऊन लिहिलेले साहित्य म्हणजे बालसाहित्य" असे गोपीनाथ तलवळकर म्हणतात. 
           

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.