३. *रावसाहेब*

                        ३.  रावसाहेब                                                    
             इथंच आहे पण दिसत नाही.....वारा. तोच वारा पाच दारा.....पावा. तोच पावा भिंतीत रोवा.....खुंटी........                          .......आज अचानक मला या उखाण्याची आठवण होण्याचं कारणही तसंच घडलं आहे. अगदी अनपेक्षित. एक अशी घटना घडून आली आहे माझ्या जीवनात. हो हो. सांगतो की. पण जरा दम तरी धरा. हं काय झालं बरं? हो. अनपेक्षित एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि म्हणाली, "काय रावसाहेब? इथंच हायसा आणि मला कुठं दिसला नाहीसा ते!" या अचानक आलेल्या प्रश्नानं मी तर अगदी गर्भगळीत झालो होतो. एकदम अंगावर वीज कोसळावी तसा मी सुन्न झालो. क्षणभर मला काही कळेनासं झालं. सुचेनासं झालं. तरीपण स्वतःला सावरत मी प्रतिप्रश्न केला, "आपण कोण? मला कसं ओळखता?" 
              "काय हे रावसाहेब? आपली तर जन्मा-जन्माची ओळख आहे. तरी तुम्ही मला ओळखत नाहीसा?"                              ........खरं तर 'रावसाहेब' हे माझं नाव नाही किंवा या टोपणनावानं मला कोणी बोलावत नाही. काही क्षण  निशब्द व निश्चयी मुद्रेने मी उभा होतो. भूतकाळाची एक सफर करून आलो. घड्याळाचे काटे उलटे फिरले. माझ्या जीवनातील अलीकडचा काळ, नोकरीच्या सुरुवातीचा काळ, तारुण्याचा काळ, कॉलेजचे जीवन, हायस्कूलचे जीवन आणि बालपणीचा काळ असा प्रवास सुरू होता. प्राथमिक शाळेतील जीवन मी पाठवू लागलो...........
              नुकतीच माझी शाळा सुरु झाली होती. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. मला शिकवायला काका गुरुजी होते. ते खूप गमतीशीर होते. लाडात येऊन शिकवायचे. शिकवता शिकवता वर्गातल्या पोरा-पोरींना काही टोपणनावे देऊन जायचे. कोणाला 'नाग'  म्हणायचे, कोणाला 'म्हशी' म्हणायचे. मला आठवले.....त्यांनीच माझे बारसे घातले होते-'रावसाहेब.' प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गात असताना त्यांनी माझे नाव ठेवले होते - 'रावसाहेब.' त्यावेळी सारा वर्ग मला 'रावसाहेब' या नावाने संबोधत होता. माझे खरे नाव होते महादेव शंकर आवळे. परंतु माझे खरे नाव बाजूला पडले आणि 'रावसाहेब' या नावानेच मी प्रसिद्ध झालो होतो.                            माझ्या वर्गात केशव, विलास, अशोक, रवींद्र, प्रकाश, संजय, मिलिंद अशी मुलांची नावे होती. तर शारदा, भारती, संपदा, हिराबाई, नयना, सोनाबाई अशी मुलींची नावे होती. भूतकाळाच्या रुपेरी पडद्यावर मी विराजमान असतानाच माझ्या कानावर परत शब्द आले 'रावसाहेब.' मी भानावर येत "हो" म्हणालो. एक एक चेहरा नजरेसमोरून घालवू लागलो. ''कोण बरे असावी? सोना, हिरा, भारती, शारदा यापैकी कोण बरे असावी? की ती वेगळीच कोणीतरी असेल?" मनामध्ये अनेक शंका-कुशंकांचे माहोल उठले होते. साठीत असणारा मी. पन्नास वर्षांपूर्वीच्या कालखंडात संचार करत होतो. इतक्या वर्षानंतर नेमकं कसं ओळखावं की ही कोण असावी? माझा प्रवास सुरु होता शोध घेण्याचा. पण काही केल्या लक्षात येईना. आणि पराभव झाला हेही मान्य होईना. शेवटी 'मी हरलो' असे म्हणावेसे वाटले. आणि म्हणालो, "बरं बाई, मी आता हरलो. कोण आहेस तू?  सांगशील का तूू? " ती खळखळून हसली आणि म्हणाली, "वय वाढलं तसा थोडा म्हातारा झालास. पण बालपणातील तुझी निरागसता काही गेली नाही हे मात्र खरं. बालपणासारखाच आजही तुझी झालेली चूक तू कबूल करतोस बरं का!"  आणि काय आश्चर्य नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले--- 'संजना.'  ती अवाक् होऊन माझ्याकडं पहात राहिली. मी विचारले,"काय झाले?"     
           "अरे लबाडा! मघापासून इतका वेळ हे नाव घ्यायला लावलास आणि आत्ता एका झटक्यात माझं नाव घेऊन मोकळा झालास."                   
             "अगं तुझ्या शेवटच्या वाक्यावरून अंदाज केला आणि तोंडी नाव आलं बघ. किती वर्षांनी भेटतेस तू? मग कसं ओळखणार मी? आणि पहिल्या सारखी दिसतेस तरी का तू?"                "मी नाही का दिसेना. पण तू मात्र आहेस तसाच आहेस बघ. फारसा बदल झालेला दिसत नाही तुझ्यात. लहानपणीसारखाच दिसतोस तू. तसाच अंगकाठीनं सडपातळ. साठी उलटली तुझी, पण देवानंदसारखा एवरीग्रीन दिसतोस तू."                        
               "अगं बाई, किती वेळ बोलत उभी राहणार आहेस तू इथे! चल माझ्या घरी जाऊ. घर जवळच आहे इथं. मारुती देवळाच्या खालच्या बाजूस. माझ्या हिचीपण ओळख होईल तुझ्याशी. बोलत बसायला मिळेल तिच्याशी तुला."                              "रावसाहेब, त्याची आता काही जरूरी नाही. माझी आणि वहिनींची ओळख झालेली आहे परवाच. नदीवर धुणे धुवायला गेल्यानंतर. तुमच्याशीच बोलत बसायला येईन सवडीने पुन्हा एकदा. मी जाते आता." अशी म्हणाली आणि क्षणाचाही विलंब न करता ती निघून गेली. तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे कितीतरी वेळ मी पहात राहिलो. घराकडे न जाताच मारुतीच्या मंदिरात जाऊन मी बसलो. भूतकाळातील घटनांचे एक एक पान काढत.....                                                        ..... तसा मी बालपणी शाळेला जात होतो. पण शाळेत न जाताच या मारूतीच्या देवळात बसायचो. दिवसभर खेळायचो. सायंकाळी पोरं शाळेतून घरी परत निघाली, की मी त्यांच्याबरोबर घरी परत जायचो. आजच्या इतकी शिक्षणाबाबत त्याकाळी एवढी जागृकता झालेली नव्हती. 'शिकला तर शिकला, नाहीतर शेतातली कामं करायला फुकटात गडी मिळाला' अशी त्यावेळी बापाची धारणा झालेली होती. एकदा माझा दोस्त केशव मला म्हणाला, "अरं म्हादू आपण शाळेला जाऊया. खूप खूप शाळा शिकूया. आपण साहेब होऊया. "                                                 
                मी म्हणालो, "अरे बाबा, गुरुजी लई मारत्यात."  तेव्हा तो म्हणाला, "अभ्यास नाही केला तर गुरुजी मारत्यात. आपण खूप खूप अभ्यास करायचा. नेहमी पहिला नंबर काढायचा."                                          
               दुसरा दिवस उजाडला. सारं जीवनच बदलून गेलं. शाळा सुरू झाली ती थांबलीच नाही. पहिलीच्या वर्गात पाय ठेवला. त्यावेळी पहिलीचा वर्ग मांगवाड्यातील समाज मंदिरात भरत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मागे एक जुनी पाठी होती. केशवनं ती पाटी काढून मला दिली. त्या पाठीवरच माझा 'श्री' गणेशा सुरू झाला. हळूहळू मी वर्गात मिसळत गेलो. आम्हाला भेटलेले काका गुरूजी फार चांगले होते. शिकवण्यात त्यांचा हातखंडा होताच, पण त्यांची मुलांना हाताळण्याची पद्धती वेगळी होती. पन्नास वर्षापूर्वी त्यांनी आपल्या वर्गात मुले आणि मुलींना एकत्र बसले होते. जात, पात, धर्म किंवा लिंग यांचा भेदभाव केला जातो हा विचारही त्यावेळी कधी मनात डोकावला नाही. काही बालसुलभ गोष्टी मात्र घडत होत्या. एकमेकांच्या खोडी काढणे होत होते. पूर्वी गोष्टीरूप रामायण होते. मला रामायण तोंडपाठ होते. दुपारी चार वाजले की खेळाचा तास असायचा. मग काय? रामायणाच्या गोष्टी खेळाच्या माध्यमातून सुरु व्हायच्या. मी राम व्हायचो, संजना सीता व्हायची. केशव मात्र हनुमान व्हायचा. कारण तो शरीराने बलदंड होता. फोटोत दाखवल्याप्रमाणे तो राम आणि सीतेला खांद्यावर घेऊन फिरायचा. खेळाचा तास केव्हा संपला हे कळायचेही नाही.                   पहिली..... दुसरी.... तिसरीला आलो. आजही मी दिलेली तिसरीची परीक्षा मला आठवते. सन१९७७-७८ सालाला मी तिसरीला होतो. आमची तिसरीची वार्षिक परीक्षा पाटीवर पेेेेेेेेेेन्सिलीने उत्तरे लिहून दिलेली आठवते. सर्वांच्या आधी माझी उत्तरे सोडवूून झाली होती. मला काका गुरुजींनी शंभर पैकी शंभर गुण पाटीवर दिलेले आठवतात. याच आनंदात मी घराकडे धूम ठोकलेली होती. हे मला आजही आठवतंय. मी चौथीच्या वर्गात आलो. स्कॉलरशिप परीक्षेला काही मुलांना बसवण्यात आले होते. त्यामध्ये मुलीही होत्या. मी, संजय, मिलिंद, महादेव, रणजीत, शिवाजी अशी मुले होती, तर संजना, नयना, संपदा, हिराबाई अशा मुली. काका गुरुजी खूप दूरच्या गावावरून येत असल्यामुळे शुक्रवारी ते मुक्कामाला  शाळेतच असायचे, मुलांना शाळेत अभ्यासाला बोलवायचे. त्यामुळे खूप अभ्यास व्हायचा.                                              फेब्रुवारी १९७९ मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती. परीक्षा वडणगे केंद्रावर होती. गावातून मधल्या वाटेने चालत जावे लागे. सहा सात किलोमीटर अंतर होते. किमान दिड-दोन तास चालत जायला आणि तितकाच वेळ परत यायला लागायचा. कारण आजच्यासारखी त्यावेळी वाहने नव्हती. मन लावून मी पेपर लिहिले. माझे डोके दुखत होते. परीक्षा होऊन परत येताना काही जण म्हणत होते की, चक्कीत धूर काढीन. शेंडीत जाळ करीन. मी मात्र अगदी शांत होतो.  कारण माझे डोके दुखत असल्याने मला काही सुचत नव्हते. सगळे मला चिडवत होते. मात्र संजना सगळ्यांना सांगत होती, "अरे त्याला चिडवून काय उपयोग? थोडं थांबा आणि पाहा. त्याचाच स्काॅलरशिप परीक्षेत नंबर येईल." काका गुरूजी शांत होते. कारण पोरं ही दंगा करणारच. पायपीट करावी लागायची. मग हसत-खेळत पोरं जातात. पायाखालची वाट वसरते.                                         
              जून महिना उगवला आणि शाळा सुरू झाली.  काही आठवड्यात स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वरणगे शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत चमकले. गावासाठी एक नवा इतिहास निर्माण झाला. गावातील स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थी येण्याचा शाळेला पहिल्यांदाच मान मिळाला होता. एक-दोन नव्हे तर  तब्बल चार विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत आले होते. त्यामध्ये जिल्हा स्तरावर मी एकटा आलो होतो. तर शिवाजी, संजय आणि मिलींद हे तिघे तालुकास्तरावरील गुणवत्ता यादीत आले होते. आजपर्यंत एकही विद्यार्थी या परीक्षेत पासही झाले नव्हते; पण यावर्षी काका गुरुजींनी चौकार लगावला होता. सारा गाव आनंदात नाचत होता. काका गुरुजींचे नाव साऱ्या पंचक्रोशीत गाजत होते. त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेत झाला होता. मुलांचे सत्कार करण्यात आले होते.                                                  कोल्हापूर जिल्ह्यात एकविसावा आणि करवीर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो होतो. काका गुरुजींनी माझी अभ्यासातील हुशारी पाहून मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालायचा निर्णय घेतला.  मे महिना सुट्टीचा महिना असतो. पण या शाळेची प्रवेश परीक्षा सुट्टीत असते. मी परीक्षा दिली. माझी निवड झाली. पण काका गुरुजींच्या पुढे प्रश्न होता. तो म्हणजे वसतीगृहात राहण्यासाठी होणारा खर्च. शिक्षण, भोजन आणि राहण्याचा खर्च काहीच नव्हता. पण कपडे, अंथरून,पांघरुणासाठी काय करायचं? तेव्हा त्यांनी तो प्रश्न निकाली काढला. माझा गावाच्या वतीने सत्कार केला. त्या सत्काराला त्यावेळेस पाचशे रुपये बक्षीस मिळाले होते. खरं म्हणजे १९७९ सालामध्ये चहाचा कप पंधरा  पैसे आणि भजी पस्तीस पैसे होती. यावरून त्या वेळच्या पाचशे रुपयेची आजची किंमत  किती असेल याचा अंदाज येईल.                            
                माझी शाळा बदलली. माझे मित्र बदलले. एका नव्या जगात मी रममाण झालो. माझे बालपणीचे मित्र-मैत्रिणी त्यांच्या जगात रममाण झाल्या. मी शिकत राहिलो. माझ्या मित्रांपैकी काही मित्र शिकत राहिले. काही मैत्रिणी शिकत राहिल्या. पण बऱ्याच मित्र आणि मैत्रिणी शाळा सोडून घरी राहिले. अनेक मुलींची लग्न झाली. त्या आपापल्या संसारात रमून गेल्या. काही कारणाने मित्रांच्या भेटी व्हायच्या. जुन्या आठवणी निघत होत्या. तेवढाच भूतकाळाचा उजाळा व्हायचा.                                         
               मनात काही गोष्टी असतात; पण व्यक्त करता येत नाहीत. त्या सुप्त अवस्थेत पडून राहतात.  पूर्वीचा काळ आजच्यासारखा सुधारलेला नव्हता किंवा विद्रोह करण्यासारखाही नव्हता. समाजाच्या, मर्यादेच्या बाहेर जाऊन गोष्टी करायच्या नाहीत असा अलिखित संकेत होता. काही गोष्टी करायच्या असतील तर त्या चोरून किंवा मर्यादित राहूनच कराव्या लागत होत्या. नाहीतर एखादी गोष्ट समजल्यावर संपूर्ण गाव वाळीत टाकत होता. गावात जरा कुठे काही समजलं की ते साऱ्या गावभर व्हायचं.                                           तसा माझा भागच वेगळा होता. कारण शाळा शिकायला बाहेर गावी, कॉलेजला कोल्हापूर शहरात, तेही वसतीगृहामध्ये. शिक्षण होताच नोकरी करावी लागली. कारण त्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी मिळताच छोकरी आली.  माझा संसार सुरू झाला. तोही सासरवाडीत. माझ्या भावांची लग्ने झाली. नंतर मी बायकोच्या इच्छेखातर गावी आलो. गावात शेती पहात नोकरी करू लागलो. सारं काही सुखात चाललं होतं. मुलं शिकली. नोकरी करू लागली. गावात दहा वर्षे राहतोय. पण आज अचानक घडलेली ही घटना. ध्यानी मनी नसताना, गावात असताना आजच संजनाची गाठभेट पडली. माझा सारा भूतकाळ माझ्या नजरेसमोरून काही क्षणात तरळून गेला. तोही एखाद्या चित्रपटासारखा. काही दिवसांनी संजना परत आमच्या घरी आली. ती म्हणाली, "दहा वर्षे झाली, पण तुला माझ्या घरी यावं असं कधी वाटलं नाही."               "हे बघ संजना, तू समजतेस तसं काही नाही. तू या गावात आहेस हेच मला माहिती नव्हतं. तुला पाहून मला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. तू माझ्यासमोर आलीस तरी मी तुला ओळखू शकलो नाही. तर मग तुला न पाहता कशी ओळखणार? माझं सारं जीवन संघर्ष करण्यात गेले. खूप वर्षापूर्वीच्या, बालपणातल्या आठवणी कशा राहणार माझ्या लक्षात?कधीमधी मित्रांची भेट व्हायची, चर्चा व्हायची. कोण कुठे आहे? कोण काय करत आहे? अशी विचारपूस व्हायची. पण तुझा फारसा उल्लेख व्हायचा नाही. कारण तुझं लग्न लवकरच झालं होतं. मी पाचवीपासूनच शिक्षणासाठी गावाच्या बाहेर होतो. लग्नानंतरही सासरवाडीत राहत होतो. दहा वर्षापूर्वी गावात आलो. पण आजही माझी फारशी गावातल्या लोकांशी ओळख नाही. मला वाटले होते की तुझं लग्न बाहेरच्या गावी झालं असेल. तुझं लग्न याच गावात झालेलं असलं तरी तू मोठ्या घरात गेलेली होतीस. मला कळलं असतं तरी मी कसा भेटायला येणार तुझ्या घरी? त्यांना काय वाटलं असतं? तूच सांग."          
                " तुझं खरं आहे म्हादू, मी असेल मोठ्या घरातील, पण भाऊ म्हणून भेटायला यायला काय हरकत होती?  नाहीतरी इतक्या वर्षात जे नातं होतं ते आता राहिलं तरी आहे का? ते केव्हाच पुसट होत गेलंय. तुझ्या मुलांची लग्नं झालीत; तशी माझ्याही मुलांची लग्नं झाली आहेत. खरं तर जे नशिबात आहे ते व्हायचं. सर्व नात्यांच्या पलीकडे मानवता नातं आहे. ते कसं विसरून चालेल!"                            .           
               त्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता. बायकोला आरती करायला सांगितली. पाट मांडायला सांगून पाटाभोवती रांगोळी काढायला सांगितली. मी पाटावर बसलो. माझा हात पुढे केला आणि संजनाला हातात राखी बांधायला सांगितली. बायकोनं कपाटातली एक नवी कोरी साडी काढून आणली. त्यादिवशी मस्तपैकी पुरणपोळीचा बेत केला. मी, बायको आणि संजना एकत्र बसून जेवण केलं. नवी साडी नेसून संजनाची पाठवणी केली. एका नव्या नात्याची सुरुवात झाली. संजना घरातून निघाली. मी त्या दिशेला कितीतरी वेळ तसाच पाहत होतो.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.