*देणाऱ्याने देत जावे......* ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांनी एक छानशी कविता लिहिली आहे. ती म्हणजे 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे| घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावेत||' ही कविता मला आठवण्याचं कारणही तसंच आहे. रांजणवाडी नावाचं छोटेसं गाव होतं. त्या गावात राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था सुरू केलेली होती. गावातील लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आलेले होते. यानिमित्ताने होतकरू विद्यार्थी, प्रामाणिकपणे कर्जफेड करणारे सभासद आणि या संस्थेमुळे ज्यांचे जीवन घडले, फुलले अशा थोर व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बगळेसाहेबांना आमंत्रित केले होते. तर अध्यक्ष म्हणून गावातीलच ज्येष्ठ नागरिक कावळेदादांची निव...
महाराष्ट्र भूमी शूरवीरांची, संत महात्म्यांची आहे. 'ज्ञानदेवे रचिला, पाया तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. अंधकाराने आंधळ्या झालेल्या समाजाचे ज्ञानरूपी काजळ काडीने डोळे स्वच्छ केलेल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. अठरापगड जाती धर्माचे संत या संप्रदायामध्ये संघटित होऊन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वसा घेतला. या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांनी फार मोठे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील वेगळ्या जाती, धर्माच्या लोकांना संत तुकारामांनी व्यवहारज्ञान शिकवले आहे. अध्यात्म आणि व्यवहार यांची जीवनात कशी सांगड घालता येईल आणि जीवन आनंदमय कसे बनवता येईल हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दचि हा देव शब्दाची गौरव करू पूजा' असा शब्दांचा महिमा त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि ...
Comments
Post a Comment