विजय

*विजय* 
 एक आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगरात एक भलं मोठं तळं होतं. त्या तळ्यात खूप खूप वर्षापासून बेडकांची वस्ती होती. आजोबा, आजी, वडील, आई, नातू, नात असा परिवार असलेली अशी अनेक कुटुंबे समाधानाने राहत होती.          
             तळ्याच्या काठावर एक मोबाईलचा टॉवर उभारला होता. सारे बेडूक त्या टॉवरकडे उत्सुकतेने पाहत होते. पण काही पिलांना माणसांनी हे नवीन काय उभे केले आहे, ते जाणून घेण्याची खूपच उत्सुकता लागली होती. मोठ्यांचा डोळा चुकवून आपण या बाळांनो, ही कथा आहे एका शूरवीर बालकाची. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तो मुलगा तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. शाळेला जाणारा विद्यार्थी. आज शाळेला सुट्टी होती. तरीही तो लवकर उठून शाळेला निघाला होता. कारण  सर्व मुलांनी शाळेत जमा व्हायचं ठरवलं होतं. तो गडबडीने घराच्या बाहेर पडत होता. तोच त्याच्या कानावर आजीचे शब्द आले. "बाळ शिरीष, आज तू लाडू वळायला येत नाहीस?" त्यावर शिरीष म्हणाला, "ते कसे शक्य आहे? तूच सांग ना गं आजी. अगं सारा देश गुलामगिरीच्या खाईत लोळत असताना मी लाडू वळायला कसा येऊ? ते आता शक्य नाही. कारण सारी मुले माझी वाट बघत बसली असतील तिकडे शाळेत. आणि मी इकडे लाडू वळत बसू! नाही. नाही. नाही. एकदा नव्हे हजारदा सांगेन की मी लाडू वळायला बसणार नाही. आजीनं त्याला विचारले, "अरे बाळ, आज शाळेला सुट्टी आहे ना? "
मला शाळेत गेलंच पाहिजे कारण शाळेत प्रभात फेरी आयोजित केले आणि आम्ही सगळी मुलं या प्रभात फेरीमध्ये सामील होणार आहे. मी जर शाळेत गेलो नाही; तर सारी मित्र मला भित्रा म्हणून चिडवतील. आणि बरं का आजी, या माझ्या भारतभूमीला जुलमी इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार? म्हणून मी जात आहे. असं बोलू नकोस गं तू." शिरीष म्हणाला. 
"तुझ्यासारखी शेंबडी पोरं काय करणार आहेत? इंग्रजांचे पोलीस पिटाळून लावतील तुम्हाला." आजी म्हणाली. "अगं आजी, तुला बापूजी माहित नाहीत? बापूजी म्हणजे आपले गांधीबाबा बरं का?"
 "बोलो भारत माता की जय, वंदे मातरम" आजीने घोषणा दिल्या. वा! आजी वा! तूही माझ्या पाठीशी उभी आहेस. मग मला भीतीचं काहीही कारण नाही. पण आजी तुझ्याशी बोलत बसलो मी इथं. त्यामुळे मला उशीर झाला बघ. घड्याळात किती वाजले बघ तरी. येतो गं आजी. भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणा देत तो घरातून बाहेर पडला. तो शाळेच्या मैदानावर कधी पोहोचला हे त्याला कळलेही नाही. तो मित्रांना म्हणाला, "हो हो माझ्या मित्रांनो, मला माफ करा. मला यायला थोडा उशीर झाला. आपली सर्व मित्रमंडळी आली ना! मग करू या सुरुवात प्रभातफेरीला. शाळेपासून प्रभात फेरीला सुरुवात केली. ग्रामपंचायत ऑफिससमोर मोर्चा आला. सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने हा मोर्चा पुढे चालला होता. 'बोलो भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत देत मोर्चा पुढे चालला होता. पोलिसांनी मुलांना अडवले आणि म्हणाले, "मुलांनो, थांबा पुढे येऊ नका, आपापल्या घरी जा. नाहीतर तुम्हांवर गोळीबार करावा लागेल. पोलिसांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलांनी काहीच ऐकले नाही. काही झालेतरी मागे हटायचे नाही असा निर्धार त्यांनी केला होता. पोलिसांनी लाठी हल्ला केला. तरीही कोणी मागे झाले नाही. गोळीबार केला तरी कोणी भ्याले नाहीत. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर या निश्चयाने ते लढत होते. मागे हटले नाहीत. मुले म्हणाली, "आम्हाला आमचा जीव प्यारा नाही. आम्ही लहान असलो म्हणून काय झाले? देशासाठी प्राण द्यायला मागे पाहणार नाही. आम्ही मागे हटणे आता शक्य नाही. आम्हाला मरण आले तरी मागे हटणार नाही. 'जिंकू किंवा मरू' हाच आमचा ध्यास आहे. आणि तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर जरूर घाला. हा मोर्चा यशस्वी करून भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करूच. पोलिसांनी बेचूट गोळीबार केला. त्यातील एक गोळी शिरीषला लागली. तो खाली कोसळला पण हातातील तिरंगा ध्वज खाली पडू दिला नाही. तो घोषणा देत होता 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'. जाऊ या याबाबत चर्चा सुरू झाली होती. पण ते आपणाला जाऊ देतील का? याची भीती होती. खरंच ते ऐकून मोठे व जाणते बेडूक मात्र धास्तावलेले होते. हे तळं म्हणजे त्यांचं विश्व होतं. त्या तळ्याच्या बाहेर कुणीही गेले नव्हते. बाहेरच्या जगाचा त्यांना अनुभव नव्हता. 
           वीरू, राहुल, सौरभ आणि सचिन या नावाची बेडकांची पिल्लं फारच बिलंदर होती. धाडसी होती. नव्या विचारांची होती. त्यांना मोठ्यांचे विचार कधीच पटत नव्हते. ती आपल्या पालकांना नेहमी म्हणत होती, "या तळ्याच्या बाहेर पडायला हवे. जगात काय चालू आहे ते पाहायला हवे. त्याशिवाय आपल्याला माणसांच्या जगातली माहिती कशी मिळणार? आणि आपली प्रगती कशी होणार?" 
यावर राहुलचा बाप म्हणाला, "मग तुम्ही आता काय करायचं ठरवलंय?" 
         यावर सचिन म्हणाला, "आम्ही ठरवलंय की माणसांनी तळ्याकाठी उभारलेल्या त्या टॉवरवर चढायचं." 
           वीरूचा बाप म्हणाला, "पोरांनो असा वेडेपणा करू नका. जे आपल्या आवाक्यात नाही. त्याचा आपण नाद करू नये. असा कराल नाद तर व्हाल बाद. आपल्या राज्यात अजूनपर्यंत असं कोणी केलेलं नाही. मी तुम्हांला बजावून सांगतो की असं तुम्ही काहीही करू नका. आपलं जग सोडून बाहेर पडू नका  तुमचं धाडस अंगाशी येईल. तुम्हाला तुमचा जीव गमावून बसावं लागेल."
 राहुल म्हणाला, "तुम्ही आम्हांला अडवू नका. आमचा निश्चय पक्का झाला आहे. आम्ही जाणारच."
          मुले ऐकून घेत नाही म्हटल्यावर सर्वात वयस्कर रामूनाना म्हणाला, " आपण सर्वांनी सांगून पाहिले. पण कुणाचेच ऐकत नाहीत. आज-कालच्या या तरुण पोरांना काही सांगायची सोय राहिलीच नाही. ती आपलं खरं करणारच. जाऊ दे त्यांना. रक्त सळसळते ना त्यांचं. घेऊ द्या अनुभव एकदा त्यांना. कारण अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाही असं म्हणतात तेच खरं. ठेच लागल्याशिवाय शहाणपण यायचा नाही त्यांना." 
             आणि खरोखरच तो दिवस उजाडला. आपल्या शूरवीरांचा पराक्रम पाहण्यासाठी तळ्यातील सर्वजण त्या टाॅवरजवळ जमली. प्रत्येकाला आतुरता वाटत होती. चौघेही आपापल्या तयारीनिशी आपल्या मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झाली. सर्वात पुढे सचिन, त्याच्यामागे सौरभ, पाठोपाठ राहुल आणि पाठीमागे विरू होता.  इकडं त्यांच्या आयाने ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली. एकमेकींच्या पोराच्या नावानं त्या बोटं मोडायला लागल्या. 'त्याच्यामुळे माझं पोर बिघडलं', 'त्याच्यामुळे माझं पोर कामातून गेलं', 'माझं पोर फार कुणाचं पण दुसऱ्याच्या संगतीने बिघडलं' असे अनेक संवाद सुरू झाले होते. काही पुरुष मंडळींनीही त्यांची री ओढायला सुरुवात केली. 'आजकालची पोरं फारच बिघडलीत,' 'थोरा-मोठ्यांचं काहीच ऐकत नाहीत.', 'मनाला येईल तशी वागतात,' 'यांना जाऊ नको म्हटलं तरी निघालीत,' 'पराक्रम गाजवायला निघालीत,' 'जे आपल्या हातात नाही त्याचा पाठलाग कशाला करायचा?' 'एक-एक जण हात-पाय मोडून माघारी फिरतील.' मनात येईल तशी बडबड सुरू होती.    
               त्या ठिकाणी उपस्थित असलेला जाणता व समजदार शामूतात्या म्हणाला, "अरे थांबा. तुम्हाला काही करता येत नसेल तर करू नका. मात्र दुसऱ्याबद्दल चांगलं तरी बोला. किमान गप्प तरी बसा. 
                एव्हाना वीरांची चढाई सुरू झाली होती. सर्वात मागे असलेला विरू हा गलका ऐकत टॉवरच्या दोन पायऱ्या चढून वर गेला होता. पण या संवादामुळे त्याचं मन विचलित झाले. त्याचे पाय लटलट कापायला लागलेत. त्याला पुढे सरकता येईना. त्याचे दोन्ही हात निसटले. दुसऱ्या पायरीवरून तो खाली पडला. त्याचे दोन्ही पाय मोडले. सर्वजण जवळ जाऊन पाहता तर काय? तो जमिनीवर पडलेला! एकदम गोंधळ सुरू झाला. त्याच्या आईने आक्रोश केला. 
           'तरी आम्ही याला म्हणत होतो असलं जगावेगळं धाडस करू नको,' 'मोडला ना पाय,' 'मिळाली ना शिक्षा,' 'भोगा आता आपल्या कर्माची फळं.' गर्दीतून असे संवाद ऐकू येत होते. 
        वीरू खाली पडला. तेव्हा जमलेले सर्व  तिघांना खाली बोलवू लागले. "अरे बाबांनो, खाली या. एकानं पाय मोडून घेतले आहेत. तुम्ही आणखी वर जाऊ नका. पडलात तर पायाबरोबर हातही गमावून बसावं लागेल. काय आश्चर्य! कसातरी दहा पायरी चढून वर गेलेला राहुल अचानक खाली पडला. त्याचे पाय आणि हातही मोडला. नुसतं धड तेवढे शिल्लक राहिलं होतं. 
         पुन्हा आरडाओरडा झाला. "अरे सौरभ, सचिन तुम्ही तरी खाली या." सगळे ओरडत होते. क्षीण आवाजात सौरभला ऐकू येत होते. त्याने मागे पाहिले तर राहुल, वीरू दिसले नाहीत. तो सोळाव्या पायरीवर पोहोचला होता. तो बावरला होता. त्याच्या हातापायातली शक्ती गेली होती. त्याचं शरीर थंड झाल्याचं त्याला जाणवायला लागलं. तसा तो खाली कोसळला. मग एकच हलकल्लोळ माजला. 
         सर्वजण गळ्याशी प्राण आणून ओरडत होते. सचिनला खाली बोलावत होते. सचिनने तिकडे लक्ष दिले नाही. कारण त्याला आपले लक्ष्य गाठायचे होते. त्याने आपल्याच नादात टॉवरची शेवटची २१ वी पायरी सर केली होती. कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता तो वर पोहोचला होता. टाॅवरच्या अगदी लाल दिव्याजवळ पोहोचला होता. त्याने आपले ध्येय गाठले होते. विजयाच्या धुंदीत बेहोष झाला होता. आपले ईप्सित पूर्ण केले होते. यशस्वीतेनंतर त्याने खाली पाहिले. त्याला दिसत होते की सगळेजण त्याचा जयघोष करत होते. सचिन जिंदाबाद..सचिन जिंदाबाद...सचिन जिंदाबाद.... हे संभाषण त्याला ऐकू जात नव्हते. तरी सर्वांचा जल्लोष पाहून त्याला आनंद झाला होता. त्याने आपली हाताची दोन बोटे उंच करून सर्वांना विजयाची खूण केली होती. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.