*कुलदीपिका* कमळा वहिनीला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हौसा सुईनीनं तिची यापूर्वी चार बाळंतपणं केली होती. तिचं हे पाचवं बाळंतपण होतं. नाक मुरडत, पदर खोचत बाहेरच्या बाजूला आवाज देत हौसा म्हणाली, "बायजाक्का, नात झाली बघ तुला." असं ऐकताच देवघरात जपमाळ करत बसलेल्या बायजाक्कानं आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, "देवा, देवा, देवा. कुठल्या जन्माचं पाप भोगाय लावलंस रं बाबा तू. वळीनं चार पोरी दिल्यास, पर म्या काय म्हटलं नाही तुला. आता पोरगा देशील असं वाटलं होतं. पण पाचव्यांदापण पोरगी दिलीस. किती आशेनं पाहत होते म्या. बाजीरावाला सांगत होते की, अरं बाबा! कोल्हापुरातल्या डॉक्टरकडून तपासून घे. पण त्यांनं माझं काही ऐकलं नाही. तो म्हणायचा, "अगं आई, तपासणी करून घ्यायला बंदी आहे. डॉक्टर तयार होत नाहीत." खरं तर पोरीचं लगीन करायचं म्हटलं तर हुंडा द्यावा लागतो. ओळीनं पाच पोरीची लग्नं करावी लागणार. त्यासाठी राब राब राबावं लागणार असं तिच्या मनात यायचं. असंच काही महिनं निघून गेले. परमेश्वराच्या दरबारात 'देर है लेकिन अंधेर नहीं है...