Posts

Showing posts from August, 2020

समास १० वी टेस्ट

समास 1.     ' भांडीकुंडी ' हे उदाहरण ......समासाचे आहे .  (1 point)       ◯ इतरेतर द्वंद्व       ◯ वैकल्पिक द्वंद्व       ◯ समाहार द्वंद्व       ◯ कर्मधारय 2.   ' चारपाच ' हे उदाहरण  (1 point)       ◯ तत्पुरुष       ◯ समाहार द्वंद्व       ◯ वैकल्पिक द्वंद्व       ◯ इतरेतर द्वंद्व 3.  समासाचे नाव ओळखा .      मीठभाकर (1 point)       ◯ अव्ययीभाव       ◯ तत्पुरुष       ◯ द्वंद्व       ◯ बहुव्रीही 4.    समासाचे नाव ओळखा .      राजवाडा  (1 point)       ☐ अव्ययीभाव        ☐ तत्पुरुष       ☐ द्वंद्व       ☐ बहुव्र...

७. * दीपलक्ष्मी*

          ७.   *दीपलक्ष्मी*              आजही तो प्रसंग आठवला की ऊर भरून येतो माझा . माझे मलाच कळत नव्हते . माझ्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती .  समोर दिसणारे दोन प्रसंग .......त्यातील पहिला प्रसंग असा - मी सोप्यामध्ये बसलेलो आहे . पूर्वेकडील भिंतीवर लावलेली समोरची शोकेस . ती बक्षिसांनी भरलेली आहे.  त्यामध्ये अनेक शिल्ड ओळींनी लावलेली आहेत.  वक्तृत्व , निबंध आणि इतर स्पर्धा मधून मिळवलेली अनेक बक्षिसे.  त्यावरून सारा भूतकाळ  समजतो आहे. दीपा पहिलीत गेल्यापासून ते पदवी आणि पदविका मिळवेपर्यंतची .........आणि दुसरा प्रसंग असा आहे की -त्याचवेळी सासरी जमिनीवर निश्चित पहुडलेली ती . अगदी शांत शांत....तिच्या भोवतीने बायका जमलेल्या . आठवणीने तिच्या पराक्रमाच्या गोष्टीचे रडत गुणगान करणाऱ्या .  त्यातच माझी बायकोही सामील झालेली . की जी या सर्व पराक्रमाची साक्षीदार होती . डोळ्यातील आसवांचा बांध फुटलेला .  अनपेक्षित झालेल्या दुःखाने व्याकूळ झालेली . कारण तिच्या जीवाचा तुकडा तिच्यापासून दूर गेलेला...

प्रकरण - ६

प्रकरण सहा विद्यानिकेतन मध्ये शाळेला असताना गणपतीची सुट्टी दिवाळीची सुट्टी एकवीस दिवस नाताळ सुट्टी आठ दिवस आणि उन्हाळा सुट्टी साधारण दीड महिना असायची असायची त्यावेळी संध्याकाळी सोप्यात मी अण्णा आणि लहान शिवाजी झोपलेलो असायचो एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी झोपलेला असायचा शिवाजी चार पाच वर्षाचा असेल मी बारा-तेरा वर्षे असेन त्यावेळी शिवाजी एकदम झोपायचा तर दुसरा दंड मी खायचं त्यावेळेला ते सांगायचे हे बघ परसु आपल्या गावातील गुजरात पोरगाव घरची खूप गरज गरीब परिस्थिती असल्यामुळे शाळेला जाताना एकच ड्रेस होता संध्याकाळी परत आल्यावर तोच ड्रेस दुरून धुऊन दुसऱ्या दिवशी घालायचा या विचाराचा माझ्यावर फार परिणाम झाला होता लहानपणी गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात मोठ्या लोकांच्या तील गुळ गोळा करून तो दुपारी चार वाजता पाट्या भरून आमच्या घराच्या समोर असलेल्या पारावर गुळाणी कडूलिंब वाटला जायचा त्यावेळी पंचांग वाचन व्हायचे आणि पावसाचा वर्षभराची वातावरणाचा हाल हवाला सांगितला जायचा त्यानंतर गूळ आणि लिंबू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडायची लिंबू घेऊन गेल्यानंतर गुड्ड्या उतरायच्या संध्याकाळी जेवण झाल्या...

प्रकरण - ५

प्रकरण-5 ' लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा '  असे अनेक मोठ्या व्यक्तींनी म्हटलेले आहे.  ते खरे असेल पण मग माझ्या बाबतीत फार खरे नव्हते.  बालपणातील सुख म्हणजे काय हेच मुळी मला माहीत नव्हते. बालपणातील आनंदाची गोष्ट म्हणजे शालेय शिक्षण जीवन. त्याविषयी आज माझे विचार मांडणार आहे. घरची आर्थिक  परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि घरात सगळी पुरुष मंडळी होती. ती पोटाच्या मागे लागलेली होती. त्यामुळे माझ्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार?  घरातून शाळेला म्हणून मी बाहेर जायचो.  भैरोबाच्या देवळात बसून परत घरी यायचो. काहीवेळा माझे हात पाय धरून , उचलून बांगडी करून मला शाळेत नेल्याचे आठवते.  पण पुन्हा शाळा बंद झाली.  ती अडीच- तीन वर्षे. घरात काहीतरी काम करायचं.  जनावरं सोडायची.  त्यांना फिरवायला न्यायचं.  हाच माझा रोजचा उपक्रम होता. मी शेजारच्या केशव , अशोक,  विलास , बत्तास , मारुती अशा बाल मंडळीबरोबर  गोट्यांनी खेळत बसायचो.  असेच एके दिवशी पाच वाजता मी , केशव , अशोक , विलास गोट्यांनी खेळत बसलो होतो. त्यावेळी शाळा सुटून मुले घरी परतत होत...

प्रकरण - ४

प्रकरण चार          अजूनही बालपणातील तो प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो.  आईचं निधन झालं , त्यावेळी मी चार-पाच वर्षाचा होतो. लहान भाऊ शिवाजी दहा महिन्याचा होता.  त्याचा सांभाळ कमळाजीनं केला होता. शिवाजी तिला आई म्हणून बोलवायचा.            घरात वडील आणि आम्ही पाच जण भाऊ.  चंद्रकांत म्हणून माझा मावस भाऊ हा लहानपणापासूनच आमच्या घरी होता.  म्हणजे घरात आम्ही एकूण सात जण पुरुषच होतो.  जेवण करण्यासाठी कोणीही बाई -माणूस घरात नव्हते. म्हणून रजपूतवाडीतील थोरली मामीअनुबाई ही जेवण करण्यासाठी आणून ठेवलेली होती.  सर्वात मोठा भाऊ संभाजी होता.  त्याचं लग्न करायचं ठरविलं होतं. नवरी मुलगी पाहण्यासाठी सुरुवात केलेली होती. आंबेवाडी येथील शिवाजी आंबी यांची मोटारगाडी घेऊन कोल्हापूर जिल्हा , सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील पाहुण्याच्या घरी भेटी सुरू झाल्या.  सगळीकडे फिरवून झाल्यावर आंबेवाडी येथील हरिभाऊ आंबी यांची मुलगी छाया ऊर्फ जनाबाई.  तिच्याशी मोठ्या भावाचं लग्न झालं.  लग्न झाल्यानंतर काही दिवसात म...
प्रकरण ३               माझा जन्म झाला त्यावेळची गोष्ट.  मी लहानपणी खूप रडायचो. कितीही शांत करायचा प्रयत्न केला तरी माझं रडणं काही थांबायचं नाही.  सर्व प्रकार करुन पाहिले.  पण मी रडायचा थांबलो नाही.  एकदा एक शेजारची आजी घरी आली होती. ती म्हणाली , " याचं रडणं थांबवायचं असंल तर त्याचं नाव बदललं पायजं.  तुमच्या घरातल्या मरण पावलेल्या एखाद्या माणसाचं नाव त्याला ठेवा , म्हणजे तो रडायचा थांबेल. "  मग माझं नाव परसू असं ठेवण्यात आलं. कारण माझ्या आजाचं म्हणजे वडलांच्या वडिलांचं नाव परसू असं होतं. नाव बदललं त्याचा फारसा परिणाम झाला की नाही मला माहीत नाही ,  पण थोडं  रडणं कमी झालं. असं मला नंतर कळायला लागल्यावर सांगण्यात आले.  रडणं कमी झालं.  पण हट्टीपणा काही कमी झाला नाही.  मी लहानपणी  खूप चहा पीत होतो.  माझ्यासाठी चहा पिण्यासाठी चिनी मातीचा एक मोठा कप होता.  साधारणत: अर्धा लिटर होईल इतका मोठा. तो कप (मग) भरून चहा दिल्या शिवाय माझं समाधान व्हायचं नाही. नाहीतर तो चहा सांडायचो. असे आता सांगितलं अ...

प्रकरण-३

प्रकरण ३               माझा जन्म झाला त्यावेळची गोष्ट.  मी लहानपणी खूप रडायचो. कितीही शांत करायचा प्रयत्न केला तरी माझं रडणं काही थांबायचं नाही.  सर्व प्रकार करुन पाहिले.  पण मी रडायचा थांबलो नाही.  एकदा एक शेजारची आजी घरी आली होती. ती म्हणाली , " याचं रडणं थांबवायचं असंल तर त्याचं नाव बदललं पायजं.  तुमच्या घरातल्या मरण पावलेल्या एखाद्या माणसाचं नाव त्याला ठेवा , म्हणजे तो रडायचा थांबेल. "  मग माझं नाव परसू असं ठेवण्यात आलं. कारण माझ्या आजाचं म्हणजे वडलांच्या वडिलांचं नाव परसू असं होतं. नाव बदललं त्याचा फारसा परिणाम झाला की नाही मला माहीत नाही ,  पण थोडं  रडणं कमी झालं. असं मला नंतर कळायला लागल्यावर सांगण्यात आले.  रडणं कमी झालं.  पण हट्टीपणा काही कमी झाला नाही.  मी लहानपणी  खूप चहा पीत होतो.  माझ्यासाठी चहा पिण्यासाठी चिनी मातीचा एक मोठा कप होता.  साधारणत: अर्धा लिटर होईल इतका मोठा. तो कप (मग) भरून चहा दिल्या शिवाय माझं समाधान व्हायचं नाही. नाहीतर तो चहा सांडायचो. असे आता सांगितलं अ...