Posts

परिसंवाद - 'काय आहेत मोबाईलला पर्याय'

परिसंवाद विषय *काय आहेत मोबाईलला पर्याय*  मोबाईल! मोबाईल!! मोबाईल!!!  या मोबाईलनं आज माणसाचं सारं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि काही वेळा झोपल्यानंतरही मोबाईल आणि मोबाईलचा विषय आपल्या आजूबाजूला सुरू असतो. म्हणजेच मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. उठता बसता या मोबाईलचेच नाव आपल्या ओठावर येते. या मोबाईलचाच अति वापर झाला आहे. याला कारण कोरोनाचा काळ. या काळामध्ये शाळा बंद झाल्या होत्या. आणि ऑनलाइन शिक्षणाचा जमाना आला होता. चार वर्षात कोरोना गेला पण मोबाईल मागे ठेवून. असं म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज हा भारत देश सोडून गेले. पण इंग्रज आपली शिक्षण पद्धती आणि कायदे इथेच ठेवून गेले. त्याप्रमाणे कोरोना आला नाही गेला, पण मोबाईल मात्र आपल्या ताब्यात देऊन गेला. खरंतर आजचे शिक्षण, मनोरंजन, संपर्क आणि व्यवसायसुद्धा मोबाईलमय  झाला आहे. आज असं एकही क्षेत्र नाही की जिथे मोबाईलचा वापर केला जात नाही. खरं तर या मोबाईलच्या अतिवापराने आपले वैयक्तिक आरोग्य, सामाजिक जीवन आणि मानसिक विकार यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणूनच आज...

वीरांगना हौसाक्का पाटील

. *वीरांगना हौसाक्का पाटील* भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करता आपल्या डोळ्यासमोर अनेक स्वातंत्र्यसेनानी उभे राहतात. त्यातील पहिले नाव आपल्यासमोर येते ते साताराच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचे. क्रांतिसिंह नाना पाटील म्हटले, की साताऱ्याचे प्रतिसरकार आठवते आणि त्यांचे पत्री सरकार आठवते. हा सारा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे.                   पण मी आपल्यासमोर एक वेगळा विषय मांडत आहे. तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्येचा. हौसाक्का यांचा. लहानपणापासूनच हौसाक्का यांच्यावर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच क्रांतीसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यातीलच हा एक प्रसंग.            पोर्तुगीज पोलिसांच्या ताब्यात इंजिनाच्या बोटी होत्या. त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांच्या मागे लागलेल्या होत्या. पोर्तुगीज पोलिसांपासून वाचण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी गोव्याच्या मांडवी नदीच्या पात्रात उड्या घेतल्या होत्या. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी...

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

*डॉ. श्रीकांत पाटील यांच्या नाट्यछटा प्रयोगक्षम असून शाळाशाळांतून त्यांचे प्रयोग झाले पाहिजेत .* परशराम आंबी महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे दोन पुरस्कार लाभलेलेले डाॅ. श्रीकांत श्रीपती पाटील हे  संशोधनपूर्वक लेखन करणारे प्रतिभाशाली लेखक आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, कादंबरी, एकांकिका इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांनी दुर्लक्षित असलेल्या नाट्यछटा लेखनाकडे आपला मोर्चा वळविला आहे. 'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' हा आपला नवीन संग्रह घेऊन ते बालकुमार वाचकांच्या भेटीला आलेले आहेत.      इतर वाङ्मयप्रकारांच्या तुलनेत नाट्यछटेचे लेखन कमी प्रमाणात झालेले आहे.  नाट्यछटा हा शब्द उच्चारताच नामवंत लेखक शंकर काशीनाथ उर्फ दिवाकर (१८८९ - १९३१) यांचेच नाव आठवते. दिवाकर हेच नाट्यछटा या वाङ्मयप्रकाराचे जनक मानले जातात. त्यांनी १९११मध्ये पहिली मराठी नाट्यछटा लिहिली, म्हणून १९११ हे मराठी नाट्यछटेचे जन्मवर्ष मानले जाते. जुन्या अभ्यासक्रमांमध्ये दिवाकरांच्या नाट्यछटा असायच्या. मागील पिढीच्या मनात नाट्यछटा म्हणजे दिवाकर, हे समीकरण दृढ झाले होते. तथापि म...

पुस्तक परीक्षण -गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची

*गोष्ट साडेपाच मिलियन डाॅलरची*          *धनाजी माळी* प्राथमिक शिक्षक असणारे आणि लेखनाच्या प्रेमात पडलेले धनाजी माळी यांनी *गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची* हा कथासंग्रह लिहिला आहे. हा कथासंग्रह वाचून मी नुकताच संपविला. खरे तर अतिशय सुंदर कथासंग्रह म्हणून याची नोंद घेता येईल. त्यामुळेच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरसारख्या एका साहित्यिक संस्थेचा पुरस्कार या कथासंग्रहात प्राप्त झाला आहे. खरं म्हणजे शिक्षिकी पेशामध्ये आल्यानंतर पुस्तकांचे वाचन करावे लागतेच. अनेक शिक्षक अनेक पुस्तके वाचत असतात. परंतु सर्वच शिक्षक लेखन करतात असे नाही. लेखन करावे वाटले तरी ते लेखनाच्या भानगडीत पडतात असे नाही.      पण आमच्या धना गुरुजींनी अनेक साहित्यिकांची पुस्तके वाचली. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकरांपासून चारुता सागर, आप्पासाहेब खोत, जयवंत दळवी, आनंद यादव, विश्वास पाटील, कृष्णात खोत, सचिन पाटील, डॉ. श्रीकांत पाटील अशा लेखकांची वेगवेगळे साहित्यिक मूल्य असणारी पुस्तके वाचली. या लेखकांच्या साहित्याचा प्रभाव धनाजी माळी यांच्यावरती पडलेला दिसून येतो.   आणि य...

बाबा आमटे

          मी आज तुम्हांला एका महामानवाची ओळख करून येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||' या उक्तीप्रमाणे वागणारे आणि 'आचारातून विचाराचा प्रचार' करणारे महामानव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके 'बाबा.'  होय. बाबा आमटे.             बाबांचे पूर्ण नाव 'मुरलीधर देविदास आमटे.' त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट गावामध्ये २६ डिसेंबर १९१४ रोजी एका श्रीमंत जहागीरदार कुटुंबात झाला. १९३४ मध्ये त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९३६ मध्ये कायद्याची एल. एल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. लगेच मध्यप्रदेशातील दुर्ग येथे वकिली सुरू केली. १९४० मध्ये वडिलोपार्जित इस्टेट सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे वकिली सुरू केली. त्याबरोबर महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या साथीने १९४२ साली सुरू झालेल्या 'छोडो भारत' चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी एका विवाहित महिलेला इंग्रजी सैनिकांच्या तावडीतून सोडविले. महात्मा गांधीजींनी त्यांना 'अभय...

कडेलूट पुस्तक परीक्षण - दत्तात्रय मानुगडे

..... कडेलूट..। .... पुस्तक परीक्षण...। .. साहित्यिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात पुष्कळ नवीन नवीन पुस्तके लेखकांचे साहित्य वाचाव्यास मिळते हे नाकारता येत नाही. आतापर्यंत बरीच काही पुस्तक परीक्षणे केली परंतु हे पुस्तक मात्र पूर्णपणे आगळे वेगळे असे आहे. आतापर्यंत काही लेखक ग्रामीण कथा लिहितात कादंबरी लिहितात परंतु साहित्यिक क्षेत्राच्या ठराविक चौकटीमध्ये त्यांचे साहित्य शब्दबद्ध केलेली असते. परंतु ही कादंबरी एक आगळावेगळा विषय घेऊन आली आहे. तो विषय आहे निसर्गाचे संतुलन, पर्यावरण यावर विशेष भर दिला आहे. डॉ. श्रीकांत पाटील यांनी एक या पुस्तकाला वेगळी दिशा देण्याचे कार्य अतिशय उत्कृष्टपणे केले आहे. या निसर्गामध्ये भरपूर झाडे लावावीत तरच पाऊस काळ भरपूर होणार आहे. झाडे लावा झाडे वाचवा असे फक्त सरकार म्हणते. परंतु प्रत्यक्षात निसर्गातील उभी असणारी हिरवीगार निसर्ग झाडी. आणि डोंगर पोखरून आज रोजी जमिनीची वाट लावण्याचे काम सध्या चालू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्याच्यासाठी डॉ. श्रीकांत पाटील लिखित,, कडेलूट,, ही कादंबरी सरकारने एकदा वाचून काढावी म्हणजे निसर्ग आमचा काय आहे हे समजल्याशिवाय राहणा...

बालसाहित्य आणि संस्कार

वरणगे गावात साहित्य संमेलन आयोजित केले होते. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर होते. या साहित्य संमेलनामध्ये श्याम कुरळे, रा. तु. भगत, किसनराव कुराडे, प्रा. दिनकर पाटील अशी नामवंत साहित्यिक मंडळी होती. त्यावेळी ग्रामीण लोकांमध्ये चर्चा चालली होती. "साहित्य म्हणजे काय रे भाऊ?" अशिक्षित लोकांना याबाबत काय माहिती असणार? ते आपल्या परिचयाच्या वस्तूंची नावे सांगत होती. एक गावकरी म्हणाला, "खोरं, टिकाव, पाट्या इत्यादी"  दुसरा गावकरी म्हणाला, "तसलं नव्हं रं बाबा. ते आपलं शेतकऱ्याचं शेतात काम करण्याचं साहित्य असतंया." "मग कसलं असतं रे साहित्य?" पहिल्याचा प्रश्न. त्यावर दुसरा म्हणाला, "अरे बाबा, आपलं शिंदे गुरुजी आहेत नव्हं! त्यांच्या डोक्यात जे विचार येतात, ते कागदावर लिहून काढतात. त्याला साहित्य म्हणतात."                 साहित्यामध्ये कथा कविता नाटक निबंध असे विविध प्रकार असतात. मनोरंजन हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. त्यातूनच ज्ञान आणि प्रबोधन करणे हे योगानेच येते. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्य करत असते. ...