पुस्तक परीक्षण ३- मिशन बिगीन अगेन
२०२० साल उजाडले ते एका वेगळ्याच कोरोनाच्या महामारीने. सगळ्या जगात कोरोनाची भयानकता पसरलेली होती. नव्या वर्षाचे स्वागतच या महामारीने झाले. जानेवारी महिन्यात भारतात प्रवेश केलेल्या या कोरोनाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सगळ्या भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० रोजी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केले. सारा भारत देश घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाला. या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सॅनिटाइजरचा वापर करण्यात आला. साबणाने हात स्वच्छ धुण्याची आणि सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करण्याची सवय लागली. अशा या महामारीविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 'मिशन बिगीन अगेन' हे ब्रीदवाक्य उच्चारले होते. याच ब्रीदवाक्याचा आधार घेऊन तानाजी पांडुरंग देशमुख यांनी 'मिशन बिगीन अगेन' हे दोन अंकी कोरोनावर आधारित नाटक लिहिले आहे. माझ्या मते कोरोनावर लिहिलेले ते पहिलेच नाटक आहे. कोरोनाने साम...