प्रस्तावना - वास्तव कथासंग्रह - फातिमा मुल्ला
*प्रस्तावना* *समाजातील सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीवर आणि दांभिकपणावर ओढलेले आसूड म्हणजे वास्तव कथासंग्रह* आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असताना आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. आपले जीवन जगताना आयुष्यामध्ये चाललेली आपली कुतरओढ पाहायला मिळते. आज माणसाचं जीवन व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, ऑडिओ कथांचा खजाना यांनी व्यापून टाकलेलं आहे. जन्माला आलेल्या लहान बाळापासून ते वृद्ध आजी-आजोबापर्यंत सर्वजण मोबाईल फोनच्या माध्यमाकडे आकृष्ट होत आहेत. मोबाईल हे माणसाचं मनोरंजनाचं साधन न राहता ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर आपल्यासमोर ज्ञानाचा विस्फोट झाला आहे; पण त्यातून आपणाला नेमके तेवढे ज्ञान निवडून घेता आले पाहिजे. आपल्यासमोर सर्व प्रकारचा मोहजाल पसरलेला दिसून येतो. तरीही आपणाला पुस्तक रूपात मिळालेला खजिना वाचताना निश्चितच आनंद होत असतो. प्रसार माध्यमांच्या या कालखंडात आजही अनेक पुस्तकांची निर्मिती होत आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका, संकीर्ण स्वरूपात वाचनासाठी खूप मोठा खजिना आपल्या हाती मिळत आहे. प्र...