पुस्तक परीक्षण- 'ज्ञानसूर्य'
*ज्ञानसूर्य* 'दलित मित्र स्वर्गीय ज्ञानोबा कदम गुरुजी कार्य आणि कर्तृत्व' हे चरित्रपर पुस्तक डॉ. श्रीकांत पाटील यांनी लिहिले आहे. "उन्नत झाले आमुचे भाल गुरुजी तुमच्यामुळे तुम्ही लावल्या कल्पतरुला आज लागली गोड फळे" स्व. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्याच्या फोटोखाली या ओळी लिहून चरित्र ग्रंथाची सुरुवात केली आहे. या पुस्तकाला सचिव, समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे गौरव पत्र वसमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुभेच्छा पत्र आहे. हा चरित्र ग्रंथ प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांना सस्नेह अर्पण केलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची, क्रांतिकारकांची, विचारवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे. या भूमीमध्ये कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्व...