Posts

Showing posts from July, 2024

आदर्श विद्यार्थी कथा

सोनगाव नावाचे एक गाव होतं. त्या गावात चंदू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची सखू नावाची पत्नी होती. त्या दोघांना नंदू नावाचा एक गुणी मुलगा होता. पण तो फार आळशी होता. त्याला खूप झोप असायची. सकाळी त्याला उठवताना तो उठायचा नाही. अंथरूणात पडून राहायचा. सकाळचे सात वाजून कधी गेले हे त्याला कळायचे नाही.            आज त्याचा वाढदिवस होता. तरी तो लवकर उठला नाही. त्याच्या आई-बाबांनी त्याला उठवलं नाही. सकाळचे नऊ वाजले होते. त्याला जाग आली. तो अंथरूणातून उठला. त्याची आई म्हणाली, "बाळ नंदू, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना? आजही तू लवकर उठला नाहीस. उलट खूप वेळाने उठलास."  तेव्हा नंदू म्हणाला, "आई, मला रात्री झोपताना माझ्या आठवणीत आज वाढदिवस आहे असं होतं; पण सकाळी विसरलो. आज रविवार  आहे आणि सुट्टीचा दिवस आहे एवढंच माझ्या लक्षात राहिलं. म्हणून मी उठलो नाही."  आई म्हणाली, "बरं. आता आटप लवकर. तुझ्या मित्रांना वाढदिवसाविषयी सांगितलेस का नाही अजून?"  " नाही." "मग कधी सांगणार तू?" "हे काय आई, मी आंघोळ करतो. चहा, नाश्ता घेतो. मग माझ्या मित्रांना सांगायला जा...

नंदूचा वाढदिवस

आदर्श विद्यार्थी

*आदर्श विद्यार्थी* नंदू आमचा लयच भारी  पर्यावरणीय आवड खरी वाढदिनी वृक्षारोपण करी  मित्रांनाही तो विनंती करी आपल्या जीवनात कधी प्लॅस्टिकचा वापर ना करी वाढदिनी चॉकलेट ना वाटी  गुडदाणीची तो वाटणी करी वर्गातील केरकचरा उचलतो साफसफाईचाही मंत्र जपतो गुणांनी आपल्या शाळेचा तो आदर्शवादी विद्यार्थीच ठरतो *परशराम आंबी*

विजय

*विजय*   एक आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगरात एक भलं मोठं तळं होतं. त्या तळ्यात खूप खूप वर्षापासून बेडकांची वस्ती होती. आजोबा, आजी, वडील, आई, नातू, नात असा परिवार असलेली अशी अनेक कुटुंबे समाधानाने राहत होती.                        तळ्याच्या काठावर एक मोबाईलचा टॉवर उभारला होता. सारे बेडूक त्या टॉवरकडे उत्सुकतेने पाहत होते. पण काही पिलांना माणसांनी हे नवीन काय उभे केले आहे, ते जाणून घेण्याची खूपच उत्सुकता लागली होती. मोठ्यांचा डोळा चुकवून आपण या बाळांनो, ही कथा आहे एका शूरवीर बालकाची. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तो मुलगा तुमच्यापेक्षा थोडासा मोठा असेल. शाळेला जाणारा विद्यार्थी. आज शाळेला सुट्टी होती. तरीही तो लवकर उठून शाळेला निघाला होता. कारण  सर्व मुलांनी शाळेत जमा व्हायचं ठरवलं होतं. तो गडबडीने घराच्या बाहेर पडत होता. तोच त्याच्या कानावर आजीचे शब्द आले. "बाळ शिरीष, आज तू लाडू वळायला येत नाहीस?" त्यावर शिरीष म्हणाला, "ते कसे शक्य आहे? तूच सांग ना गं आजी. अगं सारा देश गुलामगिरीच्या खाईत लोळत असताना...