Posts

Showing posts from July, 2022

बेडकाची पिल्ले

एका तळ्यात होती  बेडकाची पिल्ले चार  बोलण्यात होती ती  तशीच फार हुशार  केला मानवाने उभा  तळ्याकाठी एक मनोरा  चढण्यासाठी वर ती  पिल्ले धावली तरातरा  स्पर्धा लागली त्यांच्यात  कोण धावेल सर्वांत पुढे  तळ्यातील मोठी बेडकं  घेऊ लागली आढेवेढे  मनोरा चढताना खाली  पडली त्यातील तीन वरती जे चढले  तेच ठरले महान

आठवणींचा खजिना

आठवणींचा खजिना  आठवणींचा तळ शोधताना  सापडला पाहा हा खजिना  काही गोड तर काही कडू  तशाही त्या मज लागे आवडू  शाळेत येण्याआधी खेळणे  शाळेतून घरी जलद पडणे  हातपाय धुवून अभ्यास करणे  नंतर केबल मालिका पाहणे  मित्राशी भांडणतंटा करणे  जणू ती लुटूपुटूची लढाई वाटणे  भवरा आणि गोट्यांनी खेळणे  दंगा मस्तीत दिवस घालवणे

आजीशिवाय

आजीशिवाय आजीशिवाय घर म्हणजे  नुसता कोंडवाडा  साखरेशिवाय चहा जसा  काळा कडू काढा  आजीशिवाय घर म्हणजे  भासते नुसती धर्मशाळा  आव जाव मन की मर्जी  नसतो तिथे प्रेम जिव्हाळा   आजीशिवाय घर म्हणजे  देवाशिवाय देऊळ  आपल्याच नादात धडपडणाऱ्या  मुंग्यांचं वारूळ  आजीशिवाय जगणं म्हणजे  विजलेले दिवे  खरंच देवा आजीसवे मला आजोबाही हवे

मनीमाऊ

*मनीमाऊ* *मनीमाऊ* मनीमाऊ मनीमाऊ इतका भाव नका खाऊ दूध पिता चटाचट उंदीर खाता पटापट केस तुमचे मऊ मऊ  लांब नका तुम्ही जाऊ जवळ घेता तुम्हाला  लगट करता आम्हाला जेव्हा तुम्ही गेला दूर मनी लागली हुरहुर रात्री येता तुमची स्वारी मनी माझ्या आली उभारी  *परशराम आंबी*