मनीमाऊ

*मनीमाऊ*
*मनीमाऊ*

मनीमाऊ मनीमाऊ
इतका भाव नका खाऊ
दूध पिता चटाचट
उंदीर खाता पटापट

केस तुमचे मऊ मऊ 
लांब नका तुम्ही जाऊ
जवळ घेता तुम्हाला 
लगट करता आम्हाला

जेव्हा तुम्ही गेला दूर
मनी लागली हुरहुर
रात्री येता तुमची स्वारी
मनी माझ्या आली उभारी

 *परशराम आंबी*

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील