लाॅकडाऊन
कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||धृ|| कसं नांदत होतं सारं जग हे छान छान रे कोठून कसा आला कोव्हिड नाईटिन रे गल्ली ते दिल्ली कसं बदलून सारं गेलं रे कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||१|| गुण्यागोविंदाने पोरं शिकत होती छान रे गुरूजींचं शिकवणं होतं कसं सुरळीत रे ऑनलाईन शिक्षणाची सुरू झाली फॅशन रे कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||२|| कोरोनावरील लस लवकर बा मिळू दे रे सगळ्या जगाची घडीच आता बसू देत रे शाळा लवकर सुरू होऊन आनंदी होऊ दे रे कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||३||