कविता पक्ष्यांची शाळा

*पक्ष्यांची शाळा*

एकदा भरली पक्ष्यांची शाळा
सगळेजण झाले तिथे गोळा
सेक्रेटरी होता एक बगळा
चिडीचूप झाला वर्ग सगळा

दंगा करण्यात पुढे कावळा
करे वळावळा रंगाने  सावळा
कोकीळचा तर तोरा न्यारा
म्हणेना गाणं बसला गळा

पोपट आमचा दिसे छान
गाणे गाण्या घेई तान
मात्र त्यास दिसता पेरू
खाण्यात दंग हरपून भान

परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील