लाॅकडाऊन


कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||धृ||
कसं नांदत होतं सारं जग हे छान छान रे
कोठून कसा आला कोव्हिड नाईटिन रे
गल्ली ते दिल्ली कसं बदलून सारं गेलं रे
कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||१||
गुण्यागोविंदाने पोरं शिकत होती छान रे
गुरूजींचं शिकवणं होतं कसं सुरळीत रे
ऑनलाईन शिक्षणाची सुरू झाली फॅशन रे
कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||२||
कोरोनावरील लस लवकर बा मिळू दे रे
सगळ्या जगाची घडीच आता बसू देत रे
शाळा लवकर सुरू होऊन आनंदी होऊ दे रे
कशी लॉकडाऊननं थट्टा आज मांडली रे||३||

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील