बाजीराव महिपती पाटील
पाडळी बुद्रुक गावातील जय भवानी दूध संस्थेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम होता. त्यावेळी फेटे बांधण्यासाठी बाळसिंग उबाळे तिथे आले होते. ते बाजीरावला म्हणाले, "भाऊ तू काय करतोयस? मी काय करत नाही. कार्यक्रम बघायसाठी आलोय " असे बाजीराव म्हणाला. माझे काम आहे तू माझ्याबरोबर दहा मिनिटे थांबशील का असे ते म्हणाले. मी तिथे थांबलो की कार्यक्रम सगळा पूर्ण होत होत आला तोपर्यंत मी ते फेटा कसा बांधतात ते बघितलं बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिले.सगळं बघितलं.
त्यानंतर आपले आपले चुलते हिंदुराव सोनबा पाटील ते रोज फटका हातात घेऊन येऊन मला बांधायला सांगायचे. मी रोज काकांना फटका बांधायचो घेऊन माझी बांधायला शिकलो त्यानंतर उबाळे यांच्याकडे तीन महिने गेलो.
शेवटी मी म्हणालो मला फेटा बांधता येतो का ते पहा नसेल तर मी फेटा बांधायचा ना सोडून देतो. त्याने मला फेटा बांधायला सांगितला मी फेटा बांधला. तेव्हा ते म्हणाले 95 टक्के 95% तू आता तयार झाला आहेस तू स्वतः फटका बांधायला काही अडचण नाही
त्यांनी मला डॉक्टर विनय कोरे साहेब यांच्या लग्नात मान्यवरांची फेटे बांधण्यासाठी इतरांबरोबर मलाही नेले होते.
पतंगराव कदमाच्या मुलगीच्या लग्नाला पुण्याला भारती विद्यापीठ येथे घेऊन गेले नाही का परत त्यानंतर बाबासाहेब कुपेकराच्या पुतण्याच्या लग्ना साठी नेले. त्यानंतर पी डी पाटील साहेबांनी माझ्याकडे जरासं बघितलं बाजीराव तू पूर्ण ट्रेन झाला आहेस. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तू कुठेही थांबायचं नाहीस हे तुला काम जमतय. तिथून मी सुरुवात केली. त्यानंतर पी डी पाटील साहेब जिथे जाईल तिथे माझं कौतुक करून मी उत्तम पेटी बांधतो असे सांगायचे. त्याचप्रमाणे गावातील नागरिक पांडू तात्या म्हणजेच पांडुरंग दौलू पाटील यांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिले. सुरुवात के तुला काय गरज वाटली तर मी हाय मागे तुझ्या तू काय मी स्वतः तुझ्या पाठीशी आहे . माझा मावसभाऊ शिंदेवाडीचा केरबा पाटील याने मला चांगली साथ दिली तो नेहमी म्हणायचा तू तुझं काम करण्यासाठी जा घरातील काही काळजी करू नको मी स्वतः वैरण आणून टाकीन धारापाणी काढीन तुझ्या घरात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घे ईन.
कोल्हापूरचे कुस्त्यांचं मैदान म्हणजे गाजवा या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. त्यावेळी मान्यवरांना फेटे बांधताना शिवाजीराव कोटेकर यांनी पाहिले आणि ते म्हणाले की बाजीराव तुला फेटे बांधण्यासाठी ओरिसाला यावे लागेल. त्यावेळी मी त्याला म्हणालो मला स्वतः निर्णय घेऊन पोलिसाला येता येणार नाही आपण माननीय पिढी पाटील साहेब यांना विचारावे त्यावेळी त्याने पी डी पाटील साहेब यांना फोन लावला. त्यावेळी पीडी पाटील साहेब कवटीकरांना म्हणाले हे बघ बाजीराव हा माझा माणूस आहे त्याला तुने परंतु तुझ्या जबाबदारी वरती तू त्याला परत घेऊन आला पाहिजेस. त्यावेळी कवठेकर आणि होकार दिला पण मी गावी आल्यानंतर साहेबांना विचारलं मी जाऊ का त्यावेळी साहेब म्हणाले हे बघ बाजीराव ही संधी तुला पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही हे तर तुला चालून आलेली संधी आहे त्याचं सोनं कर तुला काय अडचण असेल तर मला सांग ती सगळे अडचण मी दूर करीन त्या पद्धतीने त्यांनी स्वतः त्याकाळी दहा हजाराची मदत केली होती.
ओरिसाला जाण्याचे कारण म्हणजे शिवाजीराव कवठेकर यांचे मित्र पैलवान श्री रामा चंद्रा पडी यांच्या मुलाचे लग्न होते आणि तेथे कोल्हापुरी फेटे बांधण्याचे काम करायचं होतं म्हणून त्यांनी मला आपल्याबरोबर नेले होते. हा एकमेव फेटा श्री रामा चंद्र पडी यांना बांधायच होता कारण त्यांनी कोल्हापुरात कोल्हापुरी पेटी कशी बनतात ते पाहिले होते आणि त्या पद्धतीचा फेटा आपण आपल्या मुलाच्या लग्नात बांधावा अशी त्यांची इच्छा होती तो बांधण्यासाठी बाजीराव येथे गेला होता. हा फेटा बांधत असताना लग्न मंडपात असलेले फोटोग्राफर मराठी मंडळी सर्वजण उत्सुकाने पहात होती ते पाहत असताना जणू बाजीराव च्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.
बाजीराव च्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आयोजित केली होती त्या यात्रेला कोल्हापुरी फेटे बांधण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या बंटी पाटील साहेब पृथ्वीराज पाटील साहेब यांच्यावर होती त्यांच्या वतीने गावातील नेते रामकृष्ण पाटील यांनी बाजीरावला फेटे बांधण्यासाठी हिंगोली या ठिकाणी नेले होते.
बंटी साहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी फिरून आले आणि सर्वांना रात्री दोन वाजता तयारी असायला पाहिजे असे सांगितले. त्यात त्यांच्याकडे तीस होती त्यावेळी फेटे बांधण्यासाठी दोन ग्रुप केलेले होते एक ऋतुराज पाटील यांच्याकडे दुसरा बंटी पाटील साहेब यांच्याकडे होता. ऋतुराज पाटील यांच्या गटाकडे 30 व्यक्ती पेटी बांधणारे होते तर बंटी पाटील साहेब यांच्याकडे दहा जण होते. बंटी पाटील साहेब यांच्या गटातील एका मिनिटाला एक गाडी फेटे बांधून पाठवत होते. त्यावेळी जनसंपर्क अधिकारी डीडी पाटील आले त्यांनी फेटे बांधलेले काम पाहिलं तेथे थांबलेच नाहीत ते निघून गेले. आपल्या भागातील दुसऱ्या गटात शंकरराव पाटील व इतरजण आलेले होते त्यांनी बाजीरावला तिकडे येण्याची विनंती केली पण या ठिकाणीच खूप काम असल्यामुळे मी तिकडून येऊ शकत नाही असे बाजीरावने सांगितले तेव्हा शंकराव पाटील आणि इतर लोक बाजीराव च्या ठिकाणी आले आणि पेटी बांधून घेतले. पहाटेच्या वेळी खासदार कन्हैया कुमार तेथे आले त्याने हा प्रसंग पाहिला. तेव्हा ते म्हणाले बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर येथे आणले आहे की मी कोल्हापुरात आहे हेच मला कळेनासे झाले आहे. इतके ते भारावून गेलेले होते.
शाळेमध्ये ज्या मुलांना यश मिळते शिष्यवृत्ती परीक्षा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना बाजीराव स्वतः मोफत फेटे बांधतो त्याचप्रमाणे दरवर्षी दसऱ्याला पालखीला असणारे भुई त्यांना भगवेपेटी पुजारांना पांढरे फेटे वाजणाऱ्यांना गुलाबी फेटे धनगरांना पिवळे फेटे बांधत असतो प्रवचन देणाऱ्या व्यक्तींना पांढरे फेटे बांधतो तेही मोफत स्वतःचे
वाजंत्री भोई यांना फेटे बांधण्याचे कारण सांगा ना बाजीराव असं म्हणाला की प्रत्येक वर्षी या लोकांना सन्मान द्यायचा राहिलाच परंतु अनेक जण त्यांना अपमानित करत असतात ते मला पावलं नाही शेवटी तेही माणसेच आहेत म्हणून आपणच त्यांचा सन्मान करावा. या संदर्भात पालखीचे भुई दिलीप नलवडे म्हणाले की मी आजोबापासून या पालखीला येतो पण कधी असं कोणी सन्मान माझ्या आयुष्यात केलेला पाहिला नाही तुम्ही प्रथमच असा सन्मान केलात. अशा लोकांचा आपण सन्मान करता आपणाला आपल्या आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि आपली कला ही अशीच वाढत राहणार आहे असा आशीर्वाद त्यांनी दिला.
असा हा जगावेगळा अवलिया फेटे बांधणारा बाजीराव खरं म्हणजे पैसे मिळवायचे असते तर त्याने खूप पैसा मिळवला असता परंतु एक सामाजिक जाणीव समाजाचे ऋण म्हणून तो स्वतःच्या मिळालेल्या मानधनातून अशा गोरगरीब लोकांना कलाकारांना फेटे बांधण्याचे काम करतो म्हणजे मुलखावेगळा समाजसेवक आहे.
Comments
Post a Comment