आदर्श विद्यार्थी

*आदर्श विद्यार्थी*

नंदू आमचा लयच भारी
 पर्यावरणीय आवड खरी
वाढदिनी वृक्षारोपण करी
 मित्रांनाही तो विनंती करी

आपल्या जीवनात कधी
प्लॅस्टिकचा वापर ना करी
वाढदिनी चॉकलेट ना वाटी
 गुडदाणीची तो वाटणी करी

वर्गातील केरकचरा उचलतो
साफसफाईचाही मंत्र जपतो
गुणांनी आपल्या शाळेचा तो
आदर्शवादी विद्यार्थीच ठरतो

*परशराम आंबी*

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी