युद्ध हवे की बुद्ध हवा

युद्ध हवे की बुद्ध हवा 

म्हणत होते सारेच, 
ब्रिटिशांच्या साम्राज्यावर 
सूर्य कधीच मावळत नाही. 
पण....
काळाने दाखवून दिले, 
महायुद्धाच्या रूपाने
कुणाचेच काही चालत नाही. 
इंग्लंडची जागा घेतली अमेरिकेने
जन्माला घातलं मानवाऐवजी
क्षेपणास्त्रांना तिने. 
जगावरती वर्चस्व ठेवण्या 
पोसले पाक आणि अफगाण
खुराक खावून माजणाऱ्यांनीच 
जन्माला घातलं तालीबान. 
सत्य शांती-अहिंसेचा
 संदेश देणारा बुद्ध 
त्याची मूर्ती फोडताना 
कुठे गेली होती शुद्ध? 
त्याचेच भोगा आता फळ
तिसऱ्या महायुद्धाच्या रूपाने
मलाही माहिती आहे
ओलंही जळतं वाळल्याबरोबर
पण लक्षात असू द्या हे की,
दहशतवाद-अराजकता 
संपविण्यासाठी
झगडू नये धर्माच्या नावाखाली
आणि फसव्या मानसन्मानासाठी
विचार हवाय
 बुद्ध, येशू , पैगंबराचा 
आचार हवाय
सत्य, अहिंसा प्रणालीचा 
तेव्हाच नांदेड जगात 
सुख, समाधान आणि 
मिळेल अतिरेकांना 
इथेच मूठमाती. 


Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी