मला हवेत आजी- आजोबा

आजीशिवाय घर म्हणजे 
नुसता कोंडवाडा 
साखरेशिवाय चहा जसा
काळा कडू काढा 
आजीशिवाय घर म्हणजे 
भासते नुसती धर्मशाळा 
आवजाव मन की मर्जी 
नसतो तिथे प्रेम जिव्हाळा
आजीशिवाय घर म्हणजे 
देवाशिवाय देऊळ
आपल्याच नादात धडपडणाऱ्या 
मुंग्यांचं वारूळ 
आजीशिवाय जगणं म्हणजे
विझलेले दिवे
खरंच देवा आजीसवे 
आजोबाही मला हवेत

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील