भिकारी
भिकारी मी या जगातील
फिरतो दारोदारी
लोकशाहीचा भारतवासी
आहे मी भिक्षेकरी
गेलो असाच मी
काँग्रेसनामे पक्षाच्या द्वारी
आढळला मज नेतृत्वाचा
अभाव त्यांच्या घरी
भाजपाने फोडला कितीही
टाहो जरी
तरी त्यांचे अंग आहे
धर्मांधापरी
प्रत्येक जण उठतो आणि
मांडतो वेगळी चूल
आई-बाबापासूनच जसं
वेगळं राहतं मुलं
प्रादेशिक पक्षांचा झाला
आता सुकाळ
सोडून दिला आहे कसा
साऱ्यांनीच ताळ
राजकीय पक्षांच्या
अखंड भांडणात केली
आहे अपक्षांनी मात
युती आली आणि गेली
आघाडीही घडली
अजूनही सामान्यांची
कुतर ओढ मात्र चालली
Comments
Post a Comment