शाळेत जायचंय
धावत जाऊन मला
माझ्या बाकावर बसायचंय
रोज सकाळी खड्या
आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय
नव्या वहीचा वास घेत
पहिल्या पानावर नाव लिहायचंय
भिंतीवर खडूनं रेघा मारून
खोडरबर आणि पाटीनं खेळायचंय
पाऊस पडून उद्या
मला चिखलात खेळायचंय
सुट्टी मिळेल का?
या विचारात रात्री झोपायचंय
गप्पा मारत मित्रांशी
खूप खूप बोलायचंय
घंटा होताच मला
आठवणीसह घरी परतायचे
Comments
Post a Comment