चारोळी
येता आम्ही तुमच्या द्वारी
देता हाकलून फार दूरवरी
पिंडदानास तिकडं का-वळा
म्हणे असे तो पाहा कावळा.
घरटे देखता बांधता चिमणी
ठेवता तुम्ही का हो तेचि-मनी
वेचिते ती कशी काडी काडी
तुमची मात्र राहते मनीच माडी.
आगमना वसंत गाते कोकीळ
घेतात तिच्यावरी सारे आळ
कावळ्या घरी ठेवतेस अंडे
बाकी वर्षभर जातेस कोठे?
पोपटा रंग तुझा हिरवा
नयनाला मिळेल गारवा
विठू विठू बोले बंदिस्त होता
विसरून जातोस सोडून देता.
Comments
Post a Comment