गांधीजी

गांधीजी
 तुम्ही जमविला होता
 बाळगोपाळांचा मेळा 
एकत्र केलं होतं 
साऱ्यांना गोळा. 
दाखवलात मार्ग
 श्रीकृष्ण बनून
 नव्हता त्यात
 एकही अर्जुन.
सारेच होते त्यात
 दु:शासन आणि दुर्योधन 
असंच असतं का हो
 सारंच राजकारण. 
सत्य आणि अहिंसा 
होती तुमची तत्त्वं
 अन्याय, अत्याचार 
झाली आजची सत्त्वं. 
माय मरो अगर 
मरो मावशी 
नातं असतं त्यांचं 
फक्त खुर्चीशी. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील