देश झाले प्राणी

इंग्लंड झाला सिंह
अमेरिका तर वाघ
वाघ म्हणे सिंहाला
मी आहे राजा जगाला
भारत झाला बिचारा ससा
विहार करतो कसाबसा
पाक म्हणजे धूर्त कोल्हा
खोबरं तिकडं चांगभला
अफगाण तर लबाड लांडगा
म्हणे मीच होणार दांडगा 
सिंह झाला म्हातारा अन् 
 घेणार मी वाघाची जागा 
डरकाळी फोडली वाघाने
 विचार करता लांडग्याचा 
सशाने केलेले ऐक्य पाहून
 निरोप घेई तो जंगलाचा 
आलं का तुमच्या लक्षात
दिसतो फार ससा छोटा 
लांडगांना पिटाळण्यात  
त्याचाच होता हात मोठ्ठा

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील

बोलतो मराठी