माहेरी बोलवा

चार दिवसावर आला
ओला श्रावण झुलवा 
न्याया पाठवा भावाला 
मला माहेरी बोलवा. 

दिवस आठवुनी जुने
जीव मिरवू येईल
माझे काळीज हर्षाने 
सूपाएवढे गे होईल. 

सण गौराईचा हा 
माझ्या अंगणी येईल
गणरायाचं आगमन 
सर्वा आधी होईल

झिम्मा फुगडीचा खेळ
बाई रंगत चढेल 
माहेराच्या सुखाची ही 
मला बरसात होईल 

रक्त चंदनाचा गारवा 
मला माहेरी मिळेल
 वैशाख वणवा सासरी 
भोगण्यास हा असेल

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील