भाग्यवान
भाग्यवान
अनेक जण म्हणतात
आपल्या पत्नीला भाग्यवान
प्रश्न पडतो मलाच
की कोण भाग्यवान?
तू माझी आहेस भाग्यवान
की मीच तुझ्यामुळे भाग्यवान
फुलतात अनेक प्रेमाच्या कविता
प्रेमी युगुलांनी गाणी गाता
तूच माझी भाग्यविधाता
खरंच तूच माझी सविता
Comments
Post a Comment