नवांकुर

आले देवाजीच्या मना 
तिथे कोणाचं चालंना 
विस्कटता प्रभातीचे रंग 
मना आधार लागंना ||१||
 प्रजासत्ताकाचा दिन हा 
गेला लाल किल्ला रंगून 
गुजरातला कसा दिला
 धक्का पहा भूकंपानं ||२||
 झालं होत्याचं नव्हतं 
आला बघा वणवा
सरणही नुरलं आता 
अग्नी कसा पेटवावा ||३||
 दाही दिशांतून लागला
येऊ मदतीचा पूर
 नव्या जोमाने उगवतो 
पहा हा नवांकुर

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील