ज्ञानमाऊली
प्रयोगाच्या तीरावर औदुंबराच्या छायेत
ज्ञानमाऊली विसावली साहित्याच्या मायेत
ग्रंथ चळवळ येथे जणू जोमाने फोफावली नवोदित लेखक कवींना मिळाली सावली
उत्तमरावांचे कार्य उत्तम धूळ झटकली परशरामाने साहित्याची लाज राखली मित्रांच्या सहकार्याने गाव तिथे ग्रंथालय ज्ञानात इथे सांगा काय कमी
रोज नवे पुस्तक चाळावे लिखाणाला नवी उर्मी अशीच वाढू साहित्यसंपदा इथेच नांदो सरस्वती किती कथा आणि कादंबऱ्या कोणी करावी गणती
संभाजी केशव चौगले
Comments
Post a Comment