आमच्या वेळी असं काही नव्हतं (कविता)
आमच्या वेळी असं काही नव्हतं
आजोबा बोले नातवाला
आमच्या वेळी असं काही नव्हतं
नातू विचारी आजोबांना
मग कसं होतं?
आजोबा सांगे नातवाला
आम्ही लहान असताना
मागे दोन दिवे लागत
सदऱ्याची तर बटणे
तुटलेली असत
आता बुवा तुमची
आहे फारच गंमत
जन्मताच पॅन्ट तुमच्या
ढुंगणाला बसत
आमच्या बालपणी होता
लेझमीचा खेळ
आता आहे केबलचॅनेलचा
सारा भट्ट्याबोळ
तेव्हाची गाणी होती
शांत आणि सुंदर
आता आलीत शांताबाई
चिमणी उडाली भुर्र
निघाली होती आमची
वरात बैलगाडीतनं
आता निघतात वराती
डॉल्बीच्या संगतीनं
आमचा काळ होता
सुखी आणि समाधानी
खरं आता राहिले नाही
पर्यावरण शुद्ध पाणी
Comments
Post a Comment