जात पडताळणी २
जात पडताळणी नव्हे ही तर जाचक पडताळणी मारावेत किती हेलपाटे सारेच झाले पहा उपराटे करुनी अर्ज कित्येक महिने द्यावे लागतात खूप आयने जाता कार्यालयात कामाला नोंद करावी लागेल प्रथमाला कारकुनाला भेटण्या उभा दारात पाही जमलेली सभा नंबर येता विचारता त्याला आज खूप गर्दी या उद्याला जाता मी पुन्हा कार्यालयात कागदपत्री उणीवा निघतात पुन्हा अडकते घोडे कुठेतरी येऊनि पत्र धडकते मज घरी दक्षता पथकाची कार्यवाही अंगाची होते लाही लाही हे आणा अन् तेही आणा जे दिले होते ते पुन्हा पुन्हा हिसका पचवुनि दक्षतेचा जमा हा गठ्ठा कागदपत्राचा तरीही मागणी होईल आता अर्थाविना कागद पुढे न जाता हेही कमी पडले सोबतीला सामोरी जाता समितीला देता उत्तरे नाकीनऊ आले काय हा गुन्हा जातीत जन्मले सहज होता जात पडताळणी सारे जाती पहा आनंदुनी मिळेना जया पडताळणी तया वाटे जाचक पडताळणी