माझ्या स्वप्नातील भारत भाषण
'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' खरंच माझ्या स्वप्नातील भारत साऱ्या जगात उठून दिसेल. सर्व क्षेत्रात प्रगती केलेला माझा भारत देश असेल. विकसित राष्ट्रांमध्ये माझा भारत नंबर वन असेल. जिकडे तिकडे माझ्या देशाचा गाजावाजा झालेला असेल. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाव असेल ते म्हणजे भारत..भारत...आणि भारत. 'सबसे प्यारा सबसे न्यारा, गुलिस्ता हमारा' होय. असा आदर्श भारत माझ्या स्वप्नात आहे. म्हणून माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल याबाबत चर्चा करणार आहे. ज्याचा इतिहास महान आहे, त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे, असा माझा भारत देश आहे. भारताची भूमी महान आहे. कारण ती साधू, संत, महंत, समाजसुधारक आणि क्रांतिवीरांची भूमी आहे. अहो, भारत म्हणजे रत्नांची खाण आणि बुद्धिमत्तेची शान आहे. भारतातील व्यक्तींची प्राचीन काळापासूनच बौद्धिक पातळी फार मोठी आहे. कॉम्प्युटरलाही मागे सारेल इतकी ती समृद्ध आहे. अनेक देशांना फार भीती वाटते म्हणून त्यांनी भारतात जातीय दंगली, बॉम्बस्फोट घडवून भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण साऱ्यांना भार...