नाट्यछटा *'हाच विजय'*
'हाच विजय!'
ए आई, मला बाहेर जाऊ दे ना!
असं सारखं सारखं का गं अडवत असतेस मला. ...... काय म्हणतेस? कोण आलेय? कोरोना! तो आणि कुठून आला आहे ग? आणि म्हणून जगातली सगळी माणसं अशी कोंडून घेऊन बसल्यात होय. पण कोरोना म्हणजे काय गं? .....तो व्हायरस आहे? अगं व्हायरस म्हणजे काय ग? हं. आता समजलं बघ. व्हायरस म्हणजे विषाणू या विषाणूमुळेच आपण आजारी पडतो ना? जसा बर्फाचा गोळा खाल्ला की सर्दी होते, घाणीत जाऊन खेळलो की ताप येतो. मग आपल्याला डॉक्टर मामाकडे जावं लागतं आणि इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं......काय म्हणतेस? आजारी पाडणारे विषाणू आहेत तसेच उपयोगी पडणारेही विषाणू आहेत. ते कोणते? हो. बरोबर. दुधाचे दही बनवणारे आहेत ते उपयोगी विषाणू. अहो हे सर्व आमच्या विज्ञानाच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत - एक छापा आणि दुसरा काटा. त्याप्रमाणेच उपयोगी विषाणू आणि निरुपयोगी विषाणू असे विषाणूंचेही दोन प्रकार आहेत..... म्हणतेस ताई? हा कोरोनाचा विषाणू फारच भयंकर आहे? याच्यावर अजून लसही उपलब्ध झालेली नाही. हा विषाणू मरत नाही असं विचारतेस? होय. खरंच तो मरत नाही. कारण तो निर्जीव आहे आणि तो विषाणूंचा पुंजका आहे. त्याच्यावर अजून औषध नाही की लस उपलब्ध झालेली नाही. त्याच्यापासून आपणाला वाचायचं असेल तर एकच पर्याय आहे. तो आणि कोणता? असं विचारताय होय आजोबा? तुम्ही विचारताय ते बरोबर आहे. पण तुम्हाला एवढं सोपं कसं समजत नाही. अहो, आपण एकमेकांपासून दूर राहायचं. शेजारच्या काकांनी त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले, तसं नव्हं हो. माझे बाबा तुम्हाला कसे ठेवतील वृद्धाश्रमात? आणि मी बरं कसं जाऊ देईन तुम्हाला आपल्या घरातून. हं. मी काय सांगत होतो बरं? आपण आपल्या घरात राहायचं. पण आपल्यात दोन मीटर अंतर ठेवून राहायचं. तोंडावर मास्क लावायचं. आपल्याच देशात नव्हं तर चीन, इटली, फ्रान्स, अमेरिका अशा देशातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काय म्हणताय आजोबा? अशी परिस्थिती आली होती या अगोदर आपल्या भागात? कधी? होय १९१९ च्या काळात. ती आणि कशाची आली होती तेव्हा विश्वास
Comments
Post a Comment