राजाराम तावडे पुस्तक अभिप्राय

श्री परशुराम आंबी सर यांनी लिहिलेला 'भाकरचोर' हा कथासंग्रह तीन ते चार वाचन वेळांमध्ये वाचायचा असे ठरवून वाचायला सुरुवात केली. जसजशा कथा वाचत जात होतो, तसतशी गोडी आणि उत्कंठा वाढत होती. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच पण कथांचा ग्रामीण बाज आणि खुमासदार साज यामुळे ती एक पर्वणी वाटली आणि एकाच वाचनवेळेत हा कथासंग्रह वाचून संपवला. आपल्या अवतीभवती घडलेल्या, आपण अनुभवलेल्या प्रसंगातून लेखक लिहीत जातो पण त्या विषयांची मांडणी आणि प्रकटीकरण वाचकांच्यासमोर उभं करण्यालाही खूप मोठं कसब लागतं. याच ताकतीने हा कथासंग्रह लिहिण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत हे निर्विवाद सिध्द होते. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मुद्रणापर्यंतची थाटनी आकर्षक आहे. सरांच्या लेखणीला सलाम व पुढील लेखन कार्यास शुभेच्छा. 
     राजाराम तावडे, शिरोली पुलाची.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील