कथा सिद्धी साळोखे

            रामपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावांमध्ये एक शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती अतिशय गरीब होती, पण तो खूप कष्टाळू होता. त्याला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात पटत नव्हते. ते सतत एकमेकांबरोबर छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडायचे. त्यांचे भांडण लागू नये; म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना कोणत्याही गोष्टीची समान वाटणी करून द्यायचे. त्यांचे आई-वडील त्यांना उपदेश करून थकले होते. परंतु त्यांच्या वर्तवणुकीत कोणताही बदल घडून येत नव्हता. या सर्व मुलांची वागणूक पाहून त्यांचे शेजारी त्या मुलांना  फार नावं ठेवायची. हे सर्व पाहून त्या म्हाताऱ्या आई-वडिलांना मुलांची फार काळजी वाटत होती. 
                 एके दिवशी त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचे ठरवले. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले व रानात जाऊन लाकडी काट्या आणायला सांगितले त्या चार हि भावांनी रानात जाऊन लाकडी काटक्या गोळा करून आणल्या त्यांचे वडील म्हणाले, प्रत्येकाने एक एक काठी उचला व तोडून दाखवा मुलांनी क्षणार्धात कोणताही संकोच न बाळगता उचलल्या व तोडून दाखवल्या वडील म्हणाले शाबास आता या तुम्ही आणलेल्या काट्यांची घट्ट मुळी बांधा आणि तिला तोडून दाखवा मुलांनी घट्ट बांधलेली मोळी तोडण्याचा प्रयत्न केला प्रचंड जोर लावूनही एकालाही मुळी तोडता आली नाही वडील गालातल्या गालात हसत म्हणाले पाहिलेत मुलांनो  एक  एक काठी तोडायला काही बळ लागत नाही पण हेच जर काही काट्या एकत्र आल्या आणि त्यांना घट्ट बांधले की कोणालाही तोडता येत नाही                                           तुम्हा भावांचे पण असेच आहे तुम्ही एकमेकांशी भांडणे करून एक एकटे राहायला लागलात तर कोणीही बाहेरचा येऊन तुम्हाला त्रास देईल पण तेच जर तुम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलात, आधार दिला तर तुमच्या एकीच्या शक्तीला कोणीही तोडू शकणार नाही माणसे ही एकमेकांना आधार देण्यासाठी असतात शुल्लक कारणांवरून भांडत बसायला नाही त्यामुळे तुम्हीही एकमेकांना मदत करायला शिका                                                                                             त्यादिवशी मुलांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यांनी पुढे विनाकारण भांडणे सोडून दिले त्यांनी त्यांच्या वागण्यात बदल केला पुढे ते चारही भाऊ एकमेकांना सहकार्य करत आनंदाने जीवन जगू लागले                                                           तात्पर्य: आपण जर एकजुटीने राहिलो तर आपल्याला कोणीही हानी पोहोचवू शकत नाही एकीचे बळ हे नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. 

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील