आई -
*आई*
माहीत आहे की आपणास
झाड देते सर्वाना सावली,
राव असो वा रंक असो
आई असते विठू माऊली.
मातीत असते हे झाड
झाडाला ही खूप पाने,
माझी आई माझ्यासाठी
जणू असते सोन्याचे नाणे .
देवासमोर असते समई ,
समईत आहेत वाती ,
माझी आई माझ्यासाठी
कुटुंब माळेतील मोती .
'टी' म्हणजे मराठीत चहा
तो आपण दररोज घ्यावा ,
त्यासोबत आईचा छोटा
सहवास देखील असावा .
इतर नात्यांपेक्षा नेहमी
रक्ताचे नाते असते महान
म्हणून आई शब्दांपुढे
सारे जग असते लहान
परशराम आंबी
मुख्याध्यापक
श्री नवनाथ हायस्कूल
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा
मोबा.७२१८७२४२००
Comments
Post a Comment